पोलोसाठी अडीच कोटींची गरज

By admin | Published: February 10, 2016 11:30 PM2016-02-10T23:30:33+5:302016-02-11T00:34:30+5:30

जिल्हाधिकाऱ्यांची मागणी : पुणे येथील बैठकीत मैदानाच्या विकासाबद्दल माहिती

Polo needs 2.5 crore | पोलोसाठी अडीच कोटींची गरज

पोलोसाठी अडीच कोटींची गरज

Next

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील पोलो खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी शासनस्तरावरून २ कोटी ५३ लाख रुपये निधी उपलब्ध होण्याची विनंती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केली आहे.
पुणे येथील विधानभवनात विभागातील जिल्हानिहाय जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारूप आराखडा २०१६-१७ राज्यस्तरीय बैठकीअंतर्गत सातारा जिल्ह्याच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ही विनंती केली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, मंत्री गिरीश बापट, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, महादेव जानकर, नियोजन विभागाचे अतिरिक्त
मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव
विजय कुमार, सातारा जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘सातारा जिल्हा वार्षिक योजनेचा २०१६-१७ साठी प्रारूप आराखडा एकूण २११ कोटी १० लाख रुपयांचा आहे. १४९ कोटी ४७ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी या आराखड्याात करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी रोप निर्मितीसाठी ३६ लाख रुपये तर १०० हरितगृह उभारणीसाठी २६ कोटी रुपये अशी शासनस्तरावरून अतिरिक्त तरतूद करावी. त्याचबरोबर महाबळेश्वर येथील पोलो खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी शासनस्तरावरून २ कोटी ५३ लाख रुपये निधी उपलब्ध व्हावा. जिल्हा परिषदच्या शाळांसाठी डिजिटल आणि वर्च्युअल क्लासरुम नावीन्यपूर्ण योजनेतून करण्यात येणार आहे.’ असल्याचेही त्यांनी संगणकीय सादरीकरणाच्या वेळी
सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Polo needs 2.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.