पसरणी घाटातील कठड्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:36 AM2021-04-19T04:36:23+5:302021-04-19T04:36:23+5:30

वाई : वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटातील संरक्षक कठड्यांची पडझड झाली आहे. पाचगणी, महाबळेश्वर व पुढे कोकणात जाणारा हा ...

Poor condition of pasrani ghats | पसरणी घाटातील कठड्यांची दुरवस्था

पसरणी घाटातील कठड्यांची दुरवस्था

Next

वाई : वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटातील संरक्षक कठड्यांची पडझड झाली आहे. पाचगणी, महाबळेश्वर व पुढे कोकणात जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. पसरणी घाटातून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वाहतुकीसाठी हा घाट प्रशस्त असला, तरी बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सदर बझारमध्ये आरोग्याचे तीन-तेरा

सातारा : साताऱ्यातील दाट लोकवस्तीच्या सदर बझार झोपडपट्टी परिसरात गेल्या काही दिवसांपासून डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट डुकरांच्या उपद्रवाबाबत पालिकेत तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, पालिकेकडून याची कोणतीही दखल अद्याप घेण्यात आली आहे. उघड्यावरून वाहणारे सांडपाणी व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाणीमुळे या परिसरास मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही वाढले आहे.

सांडपाणी रस्त्यावर; स्वच्छतेची मागणी

सातारा : पालिकेकडून वारंवार स्वच्छता करूनही लक्ष्मी टेकडी येथील गटारे व नाले कचऱ्याने तुडुंब भरत आहेत. गटारातील सांडपाणी मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत असून, याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी येथील गटारे बंदिस्त करण्यात यावेत, अशी मागणी येथील रहिवाशांमधून होत आहे.

Web Title: Poor condition of pasrani ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.