फलटण शहरातील विश्रामगृहाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:52 AM2021-02-26T04:52:58+5:302021-02-26T04:52:58+5:30
फलटण : सातारा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सातारा अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना फलटण ...
फलटण : सातारा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सातारा अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना फलटण विश्रामगृहाच्या दुरवस्थेबाबत निवेदन दिले व तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.
या निवेदनात म्हटले आहे की, फलटण शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी विश्रामगृह आहे. जुन्या इमारतीशेजारी गेल्या दहा वर्षांपूर्वी दोन रूम बांधलेले आहेत. नवीन आणि जुन्या विश्रामगृहाची इमारत ही अत्यंत अस्वच्छ आहे. फर्निचरची अवस्था वाईट आहे. रंगरंगोटी खराब झालेली आहे. वारंवार याबाबत दुरुस्तीची मागणी केलेली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. फलटण शहर हे सातारा-पुणे या रस्त्यावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. पुण्यावरून मुंबईवरून येणारे लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी फलटणच्या महानुभाव पंथाचे काशी, पंढरपूर, गोंदवले, म्हसवड, शिंगणापूर या ठिकाणी मंदिरासाठी व इतर कार्यक्रमासाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी थांबायचे म्हटले तरी सुद्धा त्यांची व्यवस्था या ठिकाणी होऊ शकत नाही, इतकी दुरवस्था आहे. तसेच फलटणमध्ये लोकप्रतिनिधींना बसण्यासाठीही या ठिकाणी जागा उपलब्ध नाही. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनाही याठिकाणी एखादी पत्रकार परिषद घ्यायची असेल तरीसुद्धा व्यवस्था होऊ शकत नाही. याबाबतचा सार्वजनिक विभागाकडून तातडीने अहवाल घेऊन जिल्हा नियोजनमधून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जयकुमार शिंदे यांनी निवेदनातून केली आहे.