धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा- मुख्यमंत्र्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 09:09 PM2018-03-19T21:09:56+5:302018-03-19T21:09:56+5:30
पाटण : गेल्या बावीस दिवसांपासून कोयनानगर येथे सुरू केलेल्या श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाची
पाटण : गेल्या बावीस दिवसांपासून कोयनानगर येथे सुरू केलेल्या श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयनाधरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाची मुंबई येथे विधानभवन येथे सोमवारी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या महत्त्वाचे व ऐतिहासिक निर्णय घेतले गेले.
कोयनानगर येथील आंदोलक व शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेदरम्यान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव प्रवीण परदेशी, कोयना प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळातील डॉ. भारत पाटणकर, संपत देसाई, हरिश्चंद्र दळवी, चैतन्य दळवी, बळीराम कदम, संभाजी चाळके, संजय लाड, संतोष गोटल, सचिन कदम, महेश शेलार, शैलेश सपकाळ, भगवान भोसले, प्रकाश साळुंखे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, डॉ. पाटणकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मूळ मागण्या कोणकोणत्या सकारात्मक चर्चेला घेतल्या आणि त्यावर कोणती-कोणती चर्चा झाली. त्याबाबत मंगळवार, दि. २० रोजी आंदोलनस्थळी धरणग्रस्तांच्या मेळाव्यात माहिती दिली जाणार आहे.गेल्या २२ दिवसांपासून कोयनानगर येथे केल्या जात असलेल्या ठिय्या आंदोलनाची तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला, अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोयना धरणग्रस्तांच्यावतीने श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी विविध मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी चंद्रकांत पाटील, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा