रेल्वे स्टेशनवर स्ट्रॉबेरी विकण्याबाबत प्रस्ताव दिल्यास सकारात्मक विचार - इंदुराणी दुबे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:10 PM2023-02-13T14:10:36+5:302023-02-13T14:11:15+5:30

मातांना त्यांच्या बाळांचे पोषण करण्यासाठी एक सुरक्षित फिडिंग कॉर्नर लवकरच कार्यान्वित करण्यात येणार

Positive thinking if proposed selling strawberries at railway station says Indurani Dubey | रेल्वे स्टेशनवर स्ट्रॉबेरी विकण्याबाबत प्रस्ताव दिल्यास सकारात्मक विचार - इंदुराणी दुबे

रेल्वे स्टेशनवर स्ट्रॉबेरी विकण्याबाबत प्रस्ताव दिल्यास सकारात्मक विचार - इंदुराणी दुबे

googlenewsNext

सातारा : रेल्वे स्टेशनवर स्ट्रॉबेरी विकण्याबाबत लेखी प्रस्ताव दिल्यास त्यावर सकारात्मक विचार करू. मातांना त्यांच्या बाळांचे पोषण करण्यासाठी एक सुरक्षित फिडिंग कॉर्नर लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी ग्वाही रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी दिले.

रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी शनिवारी येथील माहुली रेल्वेस्थानकाला भेट देऊन तपासणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशनसंबंधी विविध प्रश्नांविषयी अधिकारी आणि सल्लागार समिती सदस्य आदींशी सविस्तर चर्चा केली.

सातारा शहरातील सिटी बस रेल्वेच्या वेळेबरोबर जोडून घेण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन सीसीटीव्हीबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनच्या नवीन बिल्डिंगच्या कामाचा दर्जा, रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलकाबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Web Title: Positive thinking if proposed selling strawberries at railway station says Indurani Dubey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.