झारीनं पाणी घालून जगविलं बटाट्याचं पीक!-- --जिगरबाज बळीराजा

By admin | Published: September 8, 2015 09:58 PM2015-09-08T21:58:09+5:302015-09-08T21:58:09+5:30

शेतकऱ्यांची जिद्द : पिके जगविण्यासाठी विविध उपाय; हंड्याने पाणी आणून शेती भिजविण्याची धडपड

The potato peas used by water from Jharni! - - Jagir Baliaraja | झारीनं पाणी घालून जगविलं बटाट्याचं पीक!-- --जिगरबाज बळीराजा

झारीनं पाणी घालून जगविलं बटाट्याचं पीक!-- --जिगरबाज बळीराजा

Next

 

संजीव वरे - वाई पावसाने गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारल्याने सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले आहे. हातातोंडाला आलेली पिके उन्हामुळे जळून जाऊ लागली आहेत. याही परिस्थितीत दरवर्षी भरपूर पाऊस पडणाऱ्या सुगाव, ता. वाई येथील शेतकरी उपलब्ध पाण्यावर भात, झेंडू, बटाटे ही पिके वाचवण्यासाठी मोठ्या कष्टाने धडपडत आहेत. मिळेल तिथून डोक्यावर हंड्याने, बादलीने पाणी नेवून शेत भिजवत आहे. सह्याद्रीच्या कुशीत पाचगणी डोंगराच्या पायथ्याशी कुसगाव हे गाव आहे. येथील पारंपरिक शेती ही भातशेती आहे. दरवर्षी येथे भरपूर पाऊस पडतो. काही वर्षांपूर्वी येथील एका शेतकरी झेंडूच्या फुलाचे पीक घेतले. अगदी माळरानावर पावसाच्या आधारावर चांगले पीक यायचे. त्यांनी एकत्रित विक्रीसाठी मुंबईला बाजारपेठ बघितली. त्यामुळे त्यांना दसरा, दिवाळी सणांना मोठी मागणी असणाऱ्या झेंडूच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळायचे. यावर्षीही या गावातील रामचंद्र वरे, विकास हगवणे, बाळकृष्ण वरे, अजित वाडकर, शिवाजी पारटे, मंगेश वरे, अमोल वरे या शेतकऱ्यांनी महिन्यापूर्वी रोपवाटिकेतून झेंडूची रोपे आणून लागवड केली. त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे यातील काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी साठ्यातून, कधी विहिरीतून, कधी ओढ्यावर इंजिन लावून तर कधी दुसऱ्याकडून पाणी विकत घेऊन पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. पाणी पुरवून वापरले जात आहे. एक थेंबही वाया जाणार नाही, याची काळजी घेतली जातेय. कुसगाव येथील शिवाजी हगवणे हे हंड्याने पाणी नेऊन झारीने आपले बटाट्याचे पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच पाऊस पडेल, ही आशाही शेतकऱ्यांनी सोडली नाही.

Web Title: The potato peas used by water from Jharni! - - Jagir Baliaraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.