माढ्याला खिंडार; विस्कटली ‘घडी’! अखेर वेळ साधली : नाराज रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:35 AM2019-03-20T00:35:16+5:302019-03-20T00:36:55+5:30

नितीन काळेल । सातारा : राष्ट्रवादीत नाराज असलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये जाणार, अशी सुरू असणारी वंदता ...

 Potsherd Unsecured 'clock'! Lastly, the time has come: Angered Ranjitsinh Mohite-Patil in the BJP | माढ्याला खिंडार; विस्कटली ‘घडी’! अखेर वेळ साधली : नाराज रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात

माढ्याला खिंडार; विस्कटली ‘घडी’! अखेर वेळ साधली : नाराज रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादीसाठी निवडणूक अग्निदिव्य

नितीन काळेल ।
सातारा : राष्ट्रवादीत नाराज असलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये जाणार, अशी सुरू असणारी वंदता अखेर खरी ठरली असून, ते बुधवारी कमळ हाती घेणार आहेत. यामुळे माढ्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचा एक बुरूज ढासळत असून, दुसरीकडे मतदार संघातील ‘घडी’ ही विस्कटत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसाठी आताची निवडणूक अग्निदिव्यासारखी ठरणार आहे. दरम्यान, रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये जाणार हे ‘लोकमत’ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे.

माढा लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे दुसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हेही राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी करत होते. या घडामोडीत आपल्याला उमेदवारी कदाचित मिळणार नाही, याचा अंदाज मोहिते-पाटील यांना आला. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मोहिते-पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्याबाबत उदासिनता दिसून आली होती. त्यावेळी त्यांनी चाणाक्षपणे खेळी करून खुद्द शरद पवार यांनाच माढ्यातून लढविण्याचे सूचवले होते.

या प्रस्तावावर पवार यांनीही आढेवेढे घेतले; पण तेही काही दिवसांत राजी झाले. मात्र, त्यांनी माघार घेतली. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची घेतलेली भेट. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटाला जबरदस्त हादरा बसला. निवडणुकीत रणजितसिंह हे शत्रूच्या गोटात कसे गेले? माढ्यातून उमेदवारी दिली तर त्यांचा टिकाव लागणार का? का ते निवडणुकीनंतर शत्रूशी हातमिळवणी करणार, इथपर्यंत राष्ट्रवादीने विचार केल्याची माहिती आता पुढे येत आहे. त्यामुळे रणजितसिंह यांना इच्छा असूनही राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नसल्याचे सांगण्यात येते. तर शेवटी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तरी नको, असे सांगितले होते. अशी चर्चा आहे.

मोहिते-पाटील घराणे काहीतरी वेगळे पाऊल नक्कीच उचलणार, याचा अंदाज आला होता आणि याचाच भाजपने फायदा घ्यायचा ठरविले व यशस्वीही झाले.सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचे मोहिते-पाटील घराणे हे राजकारणातील मोठे प्रस्थ. सोलापूर जिल्ह्यात या घराण्याचे राजकीय वर्चस्व होते. ते भाजपमध्ये जात आहेत. राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का आहे. कारण, साखर कारखाने, विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असणारे मोहिते-पाटील घराणे राजकारणातील ‘दादा’ समजले जाते. भाजपची ताकद या घराण्यामुळे वाढली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ही निवडणूक अटीतटीची ठरणार आहे. तर माढ्यातून दोनवेळा विजय मिळविणारी राष्ट्रवादी आता काय पवित्रा घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संजयमामा का प्रभाकर देशमुख...
भाजपमध्ये रणजितसिंह मोहिते-पाटील हे प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माढ्यातील भाजपच्या उमेदवारीचा प्रश्न निकालात निघाल्याचेच समजले जाते; पण आता राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार ? या विषयावरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख या दोघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत मिळत आहेत; पण संजयमामा हे लोकसभा निवडणूक लढविण्याचे टाळत आहेत. त्यांना विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ शेवटी कोणाच्या गळ्यात पडते? हे पाहणे कुतूहलाचे ठरले आहे.

Web Title:  Potsherd Unsecured 'clock'! Lastly, the time has come: Angered Ranjitsinh Mohite-Patil in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.