सूळ वस्ती येथील कुक्कुटपालन केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:09+5:302021-07-03T04:24:09+5:30
आदर्की : हिंगणगाव ता. फलटण ग्रामपंचायत हद्दीतील सूळ वस्ती येथील कुक्कुटपालन केंद्र परिसरात कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी प्रांत अधिकारी ...
आदर्की : हिंगणगाव ता. फलटण ग्रामपंचायत हद्दीतील सूळ वस्ती येथील कुक्कुटपालन केंद्र परिसरात कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी प्रांत अधिकारी शिवाजी जगताप यांनी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे.
हिंगणगाव ग्रामपंचायत हद्दीत आदर्की रोडला सूळ वस्ती येथे पोल्ट्री फार्म आहे. त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी स्थानिक व परराज्यातील कामगार आहेत. आठवड्यात कोरोना चाचणीत ३९ कामगार कोरोना बाधित मिळाले. त्यानंतर सूळ वस्ती येथील अकराजण कोरोना बाधित आढळल्याने फलटण उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले. प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी सूळ वस्ती येथे तातडीने भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्या.
हिंगणगाव आरोग्य उपकेंद्राचे डॉ. राहुल माने, कर्मचारी उपचार करीत आहेत.