सत्ताकेंद्र मलकापूर; पण पदापासून दूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:17+5:302021-06-03T04:28:17+5:30

मलकापूर : निवडणूक कृष्णा कारखान्याची असो; अथवा इतर कोणतीही. बहुतांशी राजकीय खलबते मलकापुरातच घडतात. मात्र, तरीही कारखान्याच्या उभारणीपासून मलकापूरला ...

Power center Malkapur; But away from the post! | सत्ताकेंद्र मलकापूर; पण पदापासून दूर!

सत्ताकेंद्र मलकापूर; पण पदापासून दूर!

Next

मलकापूर : निवडणूक कृष्णा कारखान्याची असो; अथवा इतर कोणतीही. बहुतांशी राजकीय खलबते मलकापुरातच घडतात. मात्र, तरीही कारखान्याच्या उभारणीपासून मलकापूरला अद्यापही संचालकपद मिळालेले नाही. नेत्यांसमोर शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी मिळवण्यासाठी निवडणूक जाहीर झाल्यापासून उपमार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.

दिवंगत स्वातंत्र्यसैनिक ज्ञानदेव कराळे यांच्यासह मलकापुरातील तत्कालीन दिग्गजांचा ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यासह यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले, आनंदराव चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याबरोबर संस्थात्मक विकासात खारीचा वाटा आहे, तर कऱ्हाड परिसरातील नेत्यांनीही स्वातंत्र्यसंग्रामासह गोवामुक्ती आंदोलनासाठी मलकापूरवासीयांना मोलाचे सहकार्य केलेले आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या आजवरच्या सर्व निवडणुकांमध्ये अनेक सत्ता संघर्ष घडले. सध्याची पंचवार्षिक निवडणूक दुरंगी की तिरंगी, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल. कृष्णा कारखान्याचे मलकापुरात २२९ सभासद आहेत. मूळ कऱ्हाडवासीयांचे शेतीक्षेत्र मलकापुरात असल्यामुळे इतर गावांच्या तुलनेत मलकापुरात कृष्णेची सभासद संख्या कमी आहे. मलकापूरसह परिसरातील नांदलापूर, जखीणवाडी, चचेगाव या गावांतही कारखाना कार्यक्षेत्रातील मोठ्या गावांच्या तुलनेत सभासद संख्या कमी असल्यामुळे ती गावेही संचालकपदापासून वंचितच राहिली आहेत.

कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. सत्ताधारी भोसले गटाकडे उमेदवारीसाठी मोठा ओघ होता. भोसले गटाचे सत्ताकेंद्र मलकापुरातच असल्यामुळे सर्व सूत्रे येथूनच हालतात. त्यामुळे नेत्यांसमोर शक्तिप्रदर्शन करत तिकीट मिळवण्यासाठी निवडणूक जाहीर झाल्यापासून उपमार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत, तर या निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्यात आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत त्याबाबतचे चित्रही स्पष्ट होईल. यानिमित्ताने काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, जखीणवाडीचे नरेंद्र पाटील व चचेगावचे पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील यांच्यासह दिग्गजांची या निवडणुकीत नेमके काय करायचे, यासाठीची खलबतेही मलकापुरात सुरू आहेत.

Web Title: Power center Malkapur; But away from the post!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.