साताºयातील विद्युत पुरवठा पंधरा तासांनंतर सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:50 PM2017-09-09T12:50:40+5:302017-09-09T12:50:40+5:30
सातारा शहरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री सात वाजता विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तो पंधरा तासांनंतर शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरळीत झाला.
सातारा : शहरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री सात वाजता विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तो पंधरा तासांनंतर शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरळीत झाला.
साताºयात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. अधूनमधून ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे साताºयातील राजवाडाच्या पाठीमागील मंगळवार पेठ, व्यंकटपुरा, चिमणपुरा, मोरे कॉलनी, दरे बुद्रुक परिसरातील विद्युत पुरवठा गुरुवारी रात्री सातच्या सुमारास खंडीत झाला.
यासंदर्भात विचारणा करण्यासाठी परिसरातील नागरिक राजवाडा वीज कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधन्याचा प्रयत्न करत होते. परंतु, तेथील कर्मचाºयांनी दूरध्वनी बाजूला काढून ठेवला होता, त्यामुळे संपर्क होत नव्हता असा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. तो शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरळीत झाला.