वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:37 AM2021-03-06T04:37:23+5:302021-03-06T04:37:23+5:30

सातारा : येथे दर मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित केला जातो. मात्र गेल्या मंगळवारी सर्वच भागातील विद्युतपुरवठा सुरळीत होता. त्यामुळे ...

Power supply smooth | वीजपुरवठा सुरळीत

वीजपुरवठा सुरळीत

Next

सातारा : येथे दर मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित केला जातो. मात्र गेल्या मंगळवारी सर्वच भागातील विद्युतपुरवठा सुरळीत होता. त्यामुळे सातारकरांना दिलासा मिळाला. उन्हाळा सुरू होत असल्याने विजेला मागणी वाढणार आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

०००००००

खड्डा बुजविला

सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटर पालिकेकडून येऊन तहसील कार्यालयाच्या समोर मिळतो, त्याठिकाणी मोठ्या आकाराचा खड्डा पडला होता. तो संबंधित विभागाने बुजविला आहे. या ठिकाणी वाहने खड्ड्यात आदळत असत. तसेच खड्डा चुकविण्यासाठी वाहन बाजूला घेतल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. ती कोंडी आता खड्डा बुजविल्यामुळे कमी झाली आहे. यामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

००००००

उन्हापासून बचावासाठी ग्रेड सेपरेटरचा वापर

सातारा : साताऱ्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे तसेच पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या परिसरात पदपथ नसल्याने पादचाऱ्यांना उन्हातून रस्ता ओलांडणे अवघड जात आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणाई अनेकदा ग्रेड सेपरेटरमधूनच चालत बसस्थानकाकडे जात असतात.

०००००

बस फेरीची मागणी

सातारा : साताऱ्यातील राजवाड्यातून रेल्वे स्टेशनला रात्री ११ वाजता पूर्वी एसटीची फेरी असायची. त्यामुळे रात्री रेल्वेने येणाऱ्यांना साताऱ्यात येण्यास मदत होत होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या शिरकाव्यानंतर ही फेरी रद्द करण्यात आली होती. मात्र एसटीची बस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

००००

वणवा सत्र सुरूच

सातारा : साताऱ्यापासून जवळच असलेल्या यवतेश्वरच्या डोंगरावर वणवा लावण्याचे सत्र सुरूच असून, काही दिवसांपूर्वी वणवा लावला होता. तो रात्री उशिरापर्यंत धुमसत होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा नष्ट झाली. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री पुन्हा डोंगराच्या दुसऱ्या बाजूला वणवा लावण्यात आला होता.

००००००

मंजिरी सावंत यांचा गौरव

सातारा : युनिव्हर्सल ह्युमन राइट्स काऊन्सिल या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तरुण बकोलिया, राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉ. सुमन मौर्य यांच्या आदेशाने कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश जितेंद्र सकपाळ, प्रदेशाध्यक्ष सुहास सावर्डेकर, सुवर्णा कदम यांच्या शिफारशीनुसार मंजिरी तुषार सावंत यांचा गौरव करण्यात आला.

००००

साहित्यवाटप

बामणोली : जावळी तालुक्यातील फळणी प्राथमिक शाळेत सानपाडा येथील युवा फाउण्डेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना साडेचार हजारांचे शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या, कंपास, पट्टी, पेन्सिल आदी साहित्यांचा समावेश होता. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना कोरोनापासून बचावासाठी मास्कही देण्यात आले.

०००००

मजूर मिळेनात

कुडाळ : जावळी तालुक्यातील सर्वच भागात आगाप ज्वारी काढण्याच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेती-शिवार फुलले आहे. मात्र या कामांसाठी मजुूरांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य शेतात ज्वारी काढण्यासाठी जात आहेत. त्यामुळे गावात शुकशुकाट जाणवतो.

०००००००

प्रतापसिंहराजे भोसले यांना पुण्यतिथीनिमित अभिवादन

नागठाणे : साताऱ्याचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रतापसिंहराजे भोसले उर्फ दादा महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त आयुर्वेदिक गार्डन गोडोली येथे नगरसेवक अॅड. डी. जी. बनकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर, वैभव पोतदार, दिनकर मोरे, अमोल बनकर, मंगेश जगताप, मनोज सोलंकी, धीरज लोखंडे, योगेश नांदूगाडे यांनी अभिवादन केले.

फोटो :

०००००००००००००

ज्वारी काढण्यासाठी लगबग वाढली

सातारा : जिल्ह्यातील अनेक भागात ज्वारी काढणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. मात्र मजूर मिळत नसल्याने अनेक ठिकाणी सहकुटुंब शेतात जावे लागत आहे. कोरोनामुळे सध्या पाचवी ते नववीच्या वर्गाला सुटी दिली आहे. त्यामुळे मुलंही घरात असल्याने ते आई-वडिलांच्या मदतीसाठी शेतात जात आहेत. दिवसभर होईल तेवढे काम करून पुस्तकाबाहेरचे धडे गिरवत आहेत.

Web Title: Power supply smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.