ग्रामपंचायत सदस्याकडूनच सात महिने विजेची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:40 AM2021-05-23T04:40:00+5:302021-05-23T04:40:00+5:30

पुसेगाव : आवारवाडी, विसापूर (ता. खटाव) च्या महिला ग्रामपंचायत सदस्या व कुटुंबानेच सुमारे ७०० फूट केबल उघड्यावर, तर काही ...

Power theft from Gram Panchayat member for seven months | ग्रामपंचायत सदस्याकडूनच सात महिने विजेची चोरी

ग्रामपंचायत सदस्याकडूनच सात महिने विजेची चोरी

Next

पुसेगाव : आवारवाडी, विसापूर (ता. खटाव) च्या महिला ग्रामपंचायत सदस्या व कुटुंबानेच सुमारे ७०० फूट केबल उघड्यावर, तर काही ठिकाणी मातीत पुरून गेली पाच- सात महिने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची वीज चोरी केली आहे. वीज कंपनीचे अधिकारी व वायरमन यांच्या समक्ष वीज चोरी व वीज कंपनीची फसवणूक उघड झाली आहे.

विसापूरनजीकच्या आवारवाडीत महिला ग्रामपंचायत सदस्या प्रियांका तुकाराम कदम यांनी पदाचा व बळाचा वापर करून बांधलेल्या नवीन घरात विजेची सोय व्हावी म्हणून एका पोल्ट्रीमधून सुमारे ७०० फूट केबल कुठे शेताच्या बांधावर, वाहतुकीच्या रस्त्यालगत, शेतातील मातीत पुरून महावितरणची पर्यायाने महाराष्ट्र शासनाची वीज चोरी केली आहे.

खटाव सबडिव्हिजनचे शैलेश राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पुसेगाव वीज वितरण कार्यालयाचे अभियंता मेनकुदळे, लाइनमन व वायरमन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, वीज चोरीचा प्रकार उघड झाला आहे. पुसेगाव वीज वितरण कंपनीच्या वतीने स्पॉट व्हेरिफिकेशनचा रिपोर्ट सब डिव्हिजनला देण्यात येणार आहे. त्यानंतर दोषींवर कारवाई होईल, असे अभियंता मेनकुदळे यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित व्यक्तीने वीज चोरीची माहिती मुख्यमंत्री कार्यालय, वीज वितरण कंपनी, बारामती, वडूज आणि खटाव या कार्यालयाला दिली आहे.

चौकट..

सदस्यपद रद्द करण्यासाठी तक्रार

गावातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, असे वर्तन केल्याने या व्यक्तीचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शोभा हणमंत कदम या शेतकरी महिलेने जिल्हाधिकारी, पंचायत समितीकडे केली आहे. गावातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, असे वर्तन केल्याने या व्यक्तीचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शोभा हणमंत कदम या शेतकरी महिलेने जिल्हाधिकारी, पंचायत समितीकडे केली आहे.

कोट..

आवारवाडी येथे वीज चोरीचा प्रकार झाला आहे. सुमारे सातशे ते आठशे फूट केबल उघड्यावर टाकून वीज वहन करणे नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हा अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर दंडात्मक कारवाई अन्यथा पोलिसांत संबंधित वीज चोरी करणाऱ्या व्यक्तीविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

शैलेश राक्षे, खटाव वीज वितरण मुख्य उपअभियंता

फोटो:

आवरवाडी (विसापूर, ता. खटाव) येथील ग्रामपंचायत सदस्या असलेल्या व्यक्तीने वीज चोरीच्या उद्देशाने टाकलेली सुमारे सातशे फूट केबल काढताना अभियंता मेनकुदळे ,वायरमन वायदंडे व इतर.

Web Title: Power theft from Gram Panchayat member for seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.