महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या सदस्यपदी प्रभाकर देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:42 AM2021-05-21T04:42:15+5:302021-05-21T04:42:15+5:30

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या सदस्यपदी माजी विभागीय आयुक्त तथा माण तालुका राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांची निवड करण्यात ...

Prabhakar Deshmukh as a member of Maharashtra State Disaster Management Authority | महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या सदस्यपदी प्रभाकर देशमुख

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या सदस्यपदी प्रभाकर देशमुख

googlenewsNext

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या सदस्यपदी माजी विभागीय आयुक्त तथा माण तालुका राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

विविध आपत्तीसंदर्भात प्रतिबंध, निवारा, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन आदी बाबी व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ साली अंमलात आणला आहे. यामध्ये इतर बाबींसह राज्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावीपणे व्हावे आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन सदस्यांचा अंतर्भाव करून प्राधिकरणाच्या रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्र्यांच्या उपाध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समितीत प्रभाकर देशमुख यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रभाकर देशमुख यांना प्रशासनातील मोठा अनुभव असून त्यांनी प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, सचिव, विभागीय आयुक्त आदी पदांवर प्रभावीपणे काम केले आहे. त्यांना प्रशासनातील उत्कृष्ट कामाबद्दल दोनवेळा पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी कृषी आयुक्त असताना दुष्काळाचा यशस्वीपणे सामना करण्यात यश मिळवले होते. तसेच कोकणातील वादळातही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली होती. त्यांच्या या अनुभवाचा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला नक्कीच फायदा होईल.

कोट

"आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. परिस्थिती पाहून तत्काळ निर्णय घेताना जनतेच्या जीविताची व संपत्तीची हानी होऊ नये यासाठी प्रयत्न करणे तसेच तशी परिस्थिती ओढवल्यास त्वरित मदत करण्याची आवश्यकता असते. यासाठी या प्राधिकरणाच्या माध्यमातून लोकोपयोगी धोरणात्मक निर्णय घेणे व त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी मी प्रयत्न करेन.

प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्त.

फोटो-

प्रभाकर देशमुख

Web Title: Prabhakar Deshmukh as a member of Maharashtra State Disaster Management Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.