प्रमोद शिंदे यांची सहसचिव दर्जावर पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:46 AM2021-09-14T04:46:10+5:302021-09-14T04:46:10+5:30
सातारा : सातारा तालुक्यातील आणि सध्या मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रमोद शिंदे ...
सातारा : सातारा तालुक्यातील आणि सध्या मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रमोद शिंदे यांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात सहसचिव दर्जाच्या पदावर पदोन्नती झाली आहे.
सोनगाव सं. निंब येथील डॉ. प्रमोद शिंदे हे ग्रामविकास केडरमधील वरिष्ठ अधिकारी आहेत. १९९९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे त्यांची निवड झाली. यापूर्वी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी, रोजगार हमी योजना विभागात उपसचिव, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) चे राज्य समन्वयक यासह जिल्हा परिषदांमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आदी विविध पदांवर उत्कृष्ट सेवा बजावली आहे.
पदोन्नतीनंतर डॉ. शिंदे यांना सध्याच्याच म्हणजे गृहराज्यमंत्री यांचे खासगी सचिव या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. दरम्यान, यापुढील काळातही राज्याच्या विकास प्रक्रियेत योगदान देत जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहीन, असे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
- हाफ फोटो दि.१३ प्रमोद शिंदे फोटो.... (आवश्यक घ्यावा)
\\\\\\\\\\\\\\\\\\\