जखमी भेकराचे वाचविले प्राण -: शाहूनगरमधील बंधूंची तत्परता; वनविभागाच्या ताब्यात दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 08:40 PM2019-06-19T20:40:28+5:302019-06-19T20:41:15+5:30

येथील शाहूनगर परिसरात आलेल्या भेकरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, या भेकराला संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघा

Pran survivors of the injured dump;: readiness of the brothers in Shanigar; Given in the possession of forest department | जखमी भेकराचे वाचविले प्राण -: शाहूनगरमधील बंधूंची तत्परता; वनविभागाच्या ताब्यात दिले

साताऱ्यातील शाहूनगर भागात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भेकराला संतोष घुले व प्रकाश घुले यांनी वाचवून वन विभागाच्या ताब्यात दिले.

googlenewsNext
ठळक मुद्देकुत्र्यांचा हल्ला

सातारा : येथील शाहूनगर परिसरात आलेल्या भेकरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, या भेकराला संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघा बंधूंनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून प्राण वाचवले. त्यानंतर भेकराला वनविभागाच्या ताब्यात दिले.

येथील अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला शाहूगनर येथील रुणकामाता मंदिर परिसरात घुले बंधू राहण्यास आहेत. त्यांना सकाळी सहाच्या सुमारास कोणत्यातरी प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे संतोष आणि प्रकाश घुले हे दोघे घराच्या पाठीमागे आवाजाच्या दिशेने गेले. त्यावेळी त्यांना एक भेकर भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडल्याचे दिसले. दोघांनीही क्षणाचा विलंब न करता कुत्र्यांना हुसकावून लावले आणि भेकराची सुटका केली.

कुत्र्यांच्या हल्ल्यात भेकर गंभीर जखमी झाले होते. त्याला पाणी पाजल्यानंतर संतोष घुले यांनी सातारा वन विभागाचे सुहास भोसले यांना फोन करून जखमी भेकराबाबत माहिती दिली. काही वेळानंतर भोसले आले आणि त्यांनी भेकर ताब्यात घेतले. यानंतर त्या भेकराला वनविभागाच्या कार्यालयात नेऊन उपचार सुरू करण्यात आले. जखमा गंभीर असल्याने दोन-तीन दिवस उपचारानंतर भेकराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येईल, असे भोसले यांनी सांगतिले.

 

Web Title: Pran survivors of the injured dump;: readiness of the brothers in Shanigar; Given in the possession of forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.