सातारा जिल्हा परिषदेचे प्रतापसिंह शेती केंद्र पुन्हा कृषीविभागाकडे हस्तांतरित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:29 AM2017-12-15T11:29:33+5:302017-12-15T11:37:12+5:30

सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील येथील प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेतील एका बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, लवकरच तो पहिल्याप्रमाणे कृषी विभागाकडे जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. दोन वर्षांपूर्वी हे केंद्र जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शिक्षण विभागाकडे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळणे बंद झाले होते.

Pratapsingh farming center of Satara Zilla Parishad will be transferred to agriculture department again | सातारा जिल्हा परिषदेचे प्रतापसिंह शेती केंद्र पुन्हा कृषीविभागाकडे हस्तांतरित होणार

प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र

googlenewsNext
ठळक मुद्देराधिका रस्त्यावर आहे २० एकर त्रात प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून दोन वर्षांपूर्वी केंद्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान मिळणे झाले होते बंद

सातारा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील येथील प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेतील एका बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, लवकरच तो पहिल्याप्रमाणे कृषी विभागाकडे जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.

येथील राधिका रस्त्यावर प्रतापसिंह सेंद्रिय शेती केंद्र आहे. सुमारे २० एकर क्षेत्र या ठिकाणी आहे. या केंद्रात विविध पिके घेण्यात येतात. तसेच रोपवाटिका, गांडूळ खत प्रकल्प चालविण्यात येतो. यावर्षी येथे उसाचे सुमारे अडीच एकर क्षेत्र आहे. तर सोयाबीन काढण्यात आले आहे.

रोपवाटिकेत नारळाची रोपे आहेत. येथील नारळाची रोपे आणि गांडूळ बीज शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर देण्यात येत होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी हे केंद्र जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शिक्षण विभागाकडे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळणे बंद झाले होते.

Web Title: Pratapsingh farming center of Satara Zilla Parishad will be transferred to agriculture department again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.