प्रीतिसंगमावर युवकांची हुल्लडबाजी नित्यनेमाचीच ! : युवती, महिलांसह पर्यटकांना होतोय नाहक त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:27 PM2018-10-10T23:27:52+5:302018-10-10T23:29:36+5:30
कऱ्हाड येथील कृष्णा-कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर महाविद्यालयीन युवकांकडून सध्या हुल्लडबाजी करण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. त्यांच्यामुळे येथे येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कºहाड : कऱ्हाड येथील कृष्णा-कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर महाविद्यालयीन युवकांकडून सध्या हुल्लडबाजी करण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. त्यांच्यामुळे येथे येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सात महिन्यांपूर्वी या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते. मात्र, त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याने येथे हुल्लडबाजी नित्यनेमाची बनली आहे.
कºहाडच्या प्रीतिसंगमावर दररोज दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळच्यावेळी हजारो पर्यटक, प्रेमीयुगूल, नवविवाहित दाम्पत्य फिरण्यासाठी येतात. तर काही युवकांचे टोळकेही एकत्रितपणे दुचाकीवरून येते. यातील काही युवक दुचाकीवरून जीवघेणी स्टंटबाजीही करतात.
वाढदिवस साजरे करणे, फोटोसेशन करणे, मोठ-मोठ्याने आवाज करणे असे अनेक प्रकार त्यांच्याकडून केले जातात. त्यांचा या ठिकाणी येणाºया पर्यटकांना व महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागतोय.या ठिकाणी युवकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस चौकीची मागणी केली होती. या मागणीला सात महिने झाले तरी या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आलेली नाही. तर नेत्यांचे दौरे, भेटी, एखादा मोर्चा, आंदोलनाव्यतिरिक्त पोलीस कर्मचारी या ठिकाणी फिरकतही नसल्याचे दिसते.
या ठिकाणी पहाटे फिरण्यासाठी येणाºया नागरिकांची संख्या खूप आहे. तसेच सायंकाळच्यावेळी क्षणभर विश्रांती घेण्यासाठीही शहरातील अनेक कुटुंबातील व्यक्ती येतात. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावरील स्वामी बाग ही पर्यटक व नागरिकांसाठी सदैव खुली असते.
या ठिकाणी पालिकेकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक तसेच सफाई कर्मचाºयांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे. तरीही दुपारच्या वेळी युवकांकडून केल्या जाणाºया हुल्लडबाजीवेळी सुरक्षारक्षक असतात तरी कुठे? असा प्रश्न पडतो. एकंदरीत या ठिकाणी पालिकेने नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणे गरजेची आहे.
सात महिन्यांपूर्वीपासून चौकीची मागणी
प्रीतिसंगमावर हुल्लबाज महाविद्यलायीन युवकांवर कारवाई व्हावी. युवती, महिलांना सुरक्षा मिळावी म्हणून या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, तालुकाध्यक्ष दादा शिंगण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली होती. गत वर्षात एप्रिल महिन्यात मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना तसे निवेदनही दिले होते. त्यावेळी त्यांच्यासह पोलीस प्रशासनाकडूनही या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आलेली नाही.
पर्यटकांकडून पालन; स्थानिकांकडून उल्लंघन
यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावरील स्वामी बागेत बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ खाऊ नये, अथवा जेवण करून नये, अशा नियमांचे ठिकठिकाणी फलक लावलेले दिसतात. या नियमांचे राज्यभरातून येणाºया पर्यटकांकडून पालन केले जात असते. मात्र, स्थानिकांकडून उल्लंघन केले जाते.
प्रीतिसंगम बागेत पालिकेच्या सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असतानाही या ठिकाणी सर्रासपणे प्रेमीयुगूल तसेच हुल्लडबाज तरुण यांच्याकडून आक्षेपार्ह कृत्ये केली जातात. त्यामुळे येथील पावित्र्य कमी होत आहे. याकडे पालिका व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ पोलीस चौकी उभारावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- सागर बर्गे, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कºहाड