आयुर्वेदातील संशोधनाबद्दल प्रवीण पाटील यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:05+5:302021-04-03T04:35:05+5:30
कऱ्हाड : नांदगाव (ता. कऱ्हाड) येथील डाॅ. प्रवीण दत्तात्रय पाटील यांना पंचगव्य आयुर्वेदातील (संशोधन आणि नाविन्यपूर्ण श्रेणी) उल्लेखनीय कार्याबद्दल ...
कऱ्हाड : नांदगाव (ता. कऱ्हाड) येथील डाॅ. प्रवीण दत्तात्रय पाटील यांना पंचगव्य आयुर्वेदातील (संशोधन आणि नाविन्यपूर्ण श्रेणी) उल्लेखनीय कार्याबद्दल आणि एनएलपी थेरपीच्या संशोधनासाठी सन्मानित करण्यात आले.
मुंबई (विलेपार्ले) येथील भारतीय आरोग्य व्यावसायिक पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. आयआरओएलएचएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्वप्नील सुनील बंब अध्यक्षस्थानी होते. पुणे येथील इंटरनॅशनल रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लाईफ हेल्थ अँड हेल्थ सायन्सेस या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अभिनेते जॉनी लिव्हर, अली खान, अनंत जोग, सुरेखा दुग्गे, डोडाचे (जम्मू-काश्मीर) जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे, आयकर आयुक्त डॉ. मेघा भार्गव, औद्योगिक कॉरिडोर उपसंचालक प्रभा शाह, आयकर आयुक्त डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.
डॉ. प्रवीण पाटील यांना नुकतीच आयटीमधील सामरिक व्यवस्थापनासाठी ऑस्ट्रेलिया कॉमनवेल्थ विद्यापीठाची पी. एचडी. मिळाली आहे. त्यांनी गोशांळाच्या माध्यमातून विविध देशी जातींच्या गोवंशाचा अभ्यास केला व त्यातून औषधी गुणधर्म असलेली अनेक उत्पादने तयार हाेणाऱ्या संशोधनात मदत झाली.
डॉ. प्रवीण पाटील म्हणाले, देशी गायीचे आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. आरोग्याविषयी समग्र वैदिक ज्ञानाचा प्रसार होणे आवश्यक आहे. प्राचीन भारतीय औषध प्रणालीला चालना देण्याची गरज आहे. अनेक आजार मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत. ताण-तणाव, नकारात्मक आठवणी, आघात, विश्वास, चिंता, नैराश्य, फोबिया यावर आधुनिक एनएलपी थेरपीसह भारतीय मनोविज्ञानाच्या सहाय्याने उत्तम उपचार करता येतात.
फोटो :