शेतकऱ्यांत धाकधूक : शिरवळ, आदर्की परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 09:19 PM2019-12-26T21:19:12+5:302019-12-26T21:20:28+5:30

तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्'ात कोठे ना कोठे पाऊस पडायला लागलाय. गुरुवारी सकाळी खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात सुमारे १५ मिनिटे रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडला. सकाळीच पाऊस सुरू झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.

Precipitation in the area | शेतकऱ्यांत धाकधूक : शिरवळ, आदर्की परिसरात अवकाळी पाऊस

शेतकऱ्यांत धाकधूक : शिरवळ, आदर्की परिसरात अवकाळी पाऊस

Next
ठळक मुद्देपिकांवर तांबेराची भीती; ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान २१ अंशापंर्यंत वाढले

सातारा : जिल्'ातील आदर्की आणि शिरवळ परिसरात गुरुवारी सकाळी अवकाळीचा रिमझिम पाऊस झाला. यामुळे पिकांवर तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. तर ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. किमान तापमान २१ अंशाच्या वर गेले आहे. गेल्या आठवड्यात हेच तापमान १५ अंशाच्या खाली होते.

यावर्षी जिल्'ात सप्टेंबरपासून मान्सूनचा पाऊस सतत पडला. तर आॅक्टोबरच्या अखेरीपासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळीचा पाऊस झाला. यामुळे पिके आणि फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तर सततच्या पावसाचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवरही झाला. त्यामुळे उशिरा पेरणी झाल्याने सध्या पिकेही अजून लहानच आहेत. अनेक ठिकाणी गहू, हरभºयाची पेरणी सुरूच आहे.

जिल्'ात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे किमान तापमान झपाट्याने कमी झाले आहे. बुधवारी किमान तापमान १८ अंशाच्यावर होते. तर तेच गुरुवारी २१ अंशावर गेले. यामुळे उकाड्यातही वाढ झाली. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्'ात कोठे ना कोठे पाऊस पडायला लागलाय. गुरुवारी सकाळी खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात सुमारे १५ मिनिटे रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडला. सकाळीच पाऊस सुरू झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.

फलटण तालुक्यातील आदर्की परिसरातही सकाळी रिमझिम पाऊस पडला. हा पाऊस परिसरातील बिबी, सासवड आदी गावांतही झाला. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांवर तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावाची भीती वाढलीय. तसेच या भागात फळबागा आहेत. ढगाळ वातावरण कायम राहून अवकाळी पावसाने झोडपल्यास फळबागांचे मोठे नुकसान होऊ शकते. आता याच भीतीने बळीराजाच्या पोटात गोळा आलाय.

सातारा शहरातही गुरुवारी ढगाळ वातावरण होते. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातही गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. माणमध्ये तर बुधवारी सायंकाळी अवकाळीच्या पावसाची स्थिती निर्माण झालेली. त्यामुळे शेतकºयांना चिंता लागलेली. कारण, रब्बीतील पिकांना पाणी देण्यात येत आहे. त्यातच अवकाळी पाऊस झाल्यास नुकसानच होण्याची भीती होती.

  • अवकाळी पावसाचा धसका कायम...

आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी सकाळी तुरळक स्वरुपात रिमझिम पावसाने हजेरी लावली. हा पाऊस पिकांना मारक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर अवकाळी पावसाचा शेतकºयांनी चांगलाच धसका घेतलाय.

  • आदर्की महसूल मंडलात गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, मका, मूग, चवळी, घेवडा आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. असे असतानाच आता रब्बी हंगामातील पेरणीसाठी कर्ज, उसनवारी पैसा उभा केला. त्यातून ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली. या पिकांत आंतर मशागत करून पाणी देण्याचे काम सुरू असतानाच गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान रिमझिम पाऊस झाला. हा पाऊस आदर्की बुद्रुक, सासवड, बिबी परिसरात पडला. अधिक वेळ पाऊस पडला नसला तरी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांवर करपा रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच हवेमध्ये उष्णता वाढल्याने शेतकºयांच्यात चिंतेत वाढ झाली आहे.

 

 

Web Title: Precipitation in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.