तालमींच्या माध्यमातून कुस्ती व देशी खेळांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:20+5:302021-01-04T04:31:20+5:30
फलटण : ‘शहरातील शताब्दी पूर्ण केलेल्या शुक्रवार तालीम, रविवार तालीम, बारस्कर तालीम या तालीम मंडळांनी सतत कुस्ती व ...
फलटण : ‘शहरातील शताब्दी पूर्ण केलेल्या शुक्रवार तालीम, रविवार तालीम, बारस्कर तालीम या तालीम मंडळांनी सतत कुस्ती व अन्य देशी खेळांना प्राधान्य देऊन नव्या पिढीच्या आरोग्यासाठी विशेष दक्षता घेतली आहे. त्यातून सक्षम, सुदृढ, सशक्त पिढी घडविली आहे,’ असे मत अरविंद मेहता यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी तालमीचे नूतनीकरण, नव्याने वस्ताद नियुक्त करून तरुणांना कुस्तीसाठी प्रवृत्त करणे, नगरपरिषदेच्या माध्यमातून तालीम इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, आखाड्याची सुधारणा आदी कामांचा प्रारंभ महाराष्ट्र केसरी पै. गोरख सरक यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला. त्यावेळी माजी नगरसेवक सुदामराव मांढरे, माजी उपनगराध्यक्ष संजय पालकर, नगरसेवक किशोरसिंह नाईक-निंबाळकर, माजी नगसेवक चंद्रकांत शिंदे, विकास राऊत, सुनील मठपती, फिरोज आतार, प्रीतम बेंद्रे, शंभूराज बोबडे, राहुल शहा, शरद मठपती, निलेश खानविलकर, निलेश चिंचकर, योगेश शिंदे, सनी पवार, अभिजीत जानकर, संग्राम निंबाळकर, भास्कर ढेकळे, अरुण सूळ, गणेश पालकर, विजय पालकर यांच्यासह शहरातील तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुदामराव मांढरे यांनी माजी आमदार चिमणराव कदम, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या तालमीच्या विकासासाठी बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे नमूद करीत तालमीची परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करीत सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.