ढगांच्या गडगडाटात अवकाळीची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:34+5:302021-04-10T04:38:34+5:30
सातारा : मागील चार दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या सातारकरांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला. दुपारी साडेचारच्या सुमारास अवकाळी पावसाने ...
सातारा : मागील चार दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या सातारकरांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला. दुपारी साडेचारच्या सुमारास अवकाळी पावसाने ढगांचा गडगडाटात जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरातील रस्त्यावरून पाणी वाहत होते, तर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाडा कमी झाला होता. यामुळे सातारकरांना थोडासा दिलासा मिळाला.
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास तर उकाड्याचा सामना लोकांना करावा लागतो. चार दिवसांपूर्वी तर जिल्ह्यातील कमाल तापमान ३९ अंशांच्या पुढे गेले होते. त्यामुळे दुष्काळी भागात तर अंगाची लाहीलाही होत होती. असे असतानाच गुरुवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होत होते. यामुळे उन्हाची तीव्रता कमी झालेली, तर शुक्रवारी सकाळपासून ऊन कमी होते. त्यातच ढगाळ वातावरण तयार झाले. दरम्यान, सायंकाळी साडेचारच्या सुमारास सातारा शहर व परिसरात ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्याचबरोबर अवकाळी पावसाच्या जलधारा बरसू लागल्या. जवळपास वीस मिनिटे पाऊस पडत होता. यामुळे शहरातील रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले होते. त्याचबरोबर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना निवारा शोधावा लागला. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
फोटो दिंन. ०९ सातारा रेन मेलवर...
फोटो ओळ : सातारा शहरासह परिसरात शुक्रवारी दुपारी साडेचारनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. त्याचबरोबर हवेत गारवा निर्माण झाला होता. (छाया : नितीन काळेल)