सैन्य भरतीची तयारी करा...बाकीचं मी बघतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:01+5:302021-09-22T04:44:01+5:30

सातारा : कोरोना व्हायरस हा पूर्वीपासूनच आहे. त्याची भीती घेऊन सैन्य भरती रखडवणे योग्य नाही. युवक, युवतींनी भरतीची तयारी ...

Prepare for army recruitment ... I'll take care of the rest | सैन्य भरतीची तयारी करा...बाकीचं मी बघतो

सैन्य भरतीची तयारी करा...बाकीचं मी बघतो

Next

सातारा : कोरोना व्हायरस हा पूर्वीपासूनच आहे. त्याची भीती घेऊन सैन्य भरती रखडवणे योग्य नाही.

युवक, युवतींनी भरतीची तयारी करावी, भरतीची प्रक्रिया करावी यासाठी प्रशासन स्तरावर मी प्रयत्न करेन, असे आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलक युवक, युवतींना दिले आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर मंगळवारी सैन्य भरती तातडीने व्हावी, या मागणीसाठी युवकांनी ठिय्या आंदाेलन छेडले. या आंदाेलनात शेकडाे युवक, युवतींनी सहभाग नोंदवला. या आंदाेलनकर्त्यांची खासदार उदयनराजेंनी भेट घेतली. उदयनराजे म्हणाले, काेराेनामुळे भरती झाली नाही, असे मला आता सांगण्यात आले. काेराेनाचा काळ हाेता, काेराेना आहे आणि ताे राहणारच. काेणी म्हणत असेल काेराेना जाणार तर काेराेना आपल्या जन्माच्या आधीपासून इथं आहे, हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही माेबाइलवर चित्रपट पाहण्यापेक्षा जरा वैज्ञानिक दृष्टिकाेनात गाेष्टी समजून घ्या. काेराेनाबाबतीत वाचन करा, असा सल्ला उदयनराजेंनी उपस्थित युवकांना दिला. दाेन वर्षांपूर्वी आम्हाला निवेदन दिले असते तर आम्ही काेविड १९ च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून वरिष्ठ कार्यालयात दिले असते, असे प्रशासनाने मला सांगितले.

उदयनराजे म्हणाले, ‘तुम्ही वेळ गमावून बसला आहात. नाेव्हेंबरला भरती करायची असल्यास वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार हाेणे आवश्यक आहे. तुम्ही प्रशासनास निवेदन द्या, मी त्याचा पाठपुरावा करीन. जिल्हा प्रशासनाच्या हातात काही नाही, असेही खासदार उदयनराजे भाेसले यांनी नमूद केले.

राज्य सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे राज्यात कोरोनाच्या नावाखाली गेले दोन वर्षे सैन्य भरती रखडली आहे. ही भरती तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी जयवंत आरळे व अमोल साठे यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातील तरुण हजारो रुपये खर्च करून अकॅडमी जॉइन करत आहेत. सैन्य भरतीसाठी १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे अशी वयोमर्यादा असून, २ वर्षे भरती न झाल्याने अनेक जणांचा अपेक्षाभंग झाला आहे. होतकरू तरुण हे अहोरात्र शारीरिक व बौद्धिक मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. राज्यात २ वर्षे भरती न झाल्याने सुमारे २० लाखांहून अधिक तरुण बेरोजगार झाले आहेत. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत स्पोर्ट व सेंट्रल भरती सुरू आहे. राज्य सरकार कोरोनाचे कारण पुढे करत भरती टाळत आहे. सैन्य बोर्ड भरती प्रक्रिया करण्यास तयार असताना राज्य सरकारकडून परवानगी दिली जात नाही. याबाबत युवक, युवतींनी निदर्शने केली.

भरतीचे वय वाढवणे गरजेचे

राज्य सरकारने सैन्य भरतीस परवानगी द्यावी, भरती प्रक्रिया घेणार नसाल तर वय वाढवून मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे. सर्वच क्षेत्रांतील भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा वाढवणे जरुरीचे आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

फोटो नेम : २१जावेद

फोटो ओळ : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सैन्य भरतीसाठी इच्छुक युवक, युवतींनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. (छाया : जावेद खान)

Web Title: Prepare for army recruitment ... I'll take care of the rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.