बर्ड फ्लू रोखण्यासाठी पूर्ण तयारी : परिहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:20+5:302021-01-13T05:43:20+5:30
सातारा : बर्ड फ्लू रोगाची प्रतिबंधात्मक उपाययोजना भाग म्हणून रोग सर्वेक्षण केले जात आहे. जिल्ह्यात ४८ शीघ्र उपाययोजना करण्यासाठी ...
सातारा : बर्ड फ्लू रोगाची प्रतिबंधात्मक उपाययोजना भाग म्हणून रोग सर्वेक्षण केले जात आहे. जिल्ह्यात ४८ शीघ्र उपाययोजना करण्यासाठी पथके तयार केली आहेत. जिल्ह्यात जर कावळे, पोपट, बगळे, वन्य पक्षी किंवा स्थलांतरित पक्षी मृत झाल्याचे निदर्शनास आले तर नागरिकांनी पशुसंवर्धन विभागास त्वरित माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी मंगळवारी केले आहे.
परंपरागत भारतीय अन्न उकळून शिजवण्याच्या पद्धतीनुसार कोंबडी मास व अंडी खाणे हे पूर्णत: सुरक्षित असून पक्षी व अंडी विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नये.
बर्ड फ्लू रोगाचे विषाणू प्रामुख्याने स्थलांतरित पक्षी किंवा अन्य वन्यपक्षी यांमध्ये आढळून येत असल्याने जिल्ह्यामधील सर्व जलाशये, तलाव किंवा पाणवठ्याच्या जागी कोणतीही असाधारण पक्षी मृतबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.