कोपर्डे हवेली परिसरात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:29 AM2021-02-19T04:29:31+5:302021-02-19T04:29:31+5:30

गुरुवारी पाहटेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह अवेळी अलेलेल्या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारी काळी पडण्याचा धोका निर्माण ...

Presence of rain in Koparde mansion area | कोपर्डे हवेली परिसरात पावसाची हजेरी

कोपर्डे हवेली परिसरात पावसाची हजेरी

Next

गुरुवारी पाहटेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह अवेळी अलेलेल्या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारी काळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर सध्याचा पाऊस हा गहू पिकासाठी हानिकारक ठरू शकतो.

त्यानंतर गुरुवारी दुपारी दोनपर्यंत जमिनीला घात नसल्याने ऊसतोड बंद होती. पाऊस जोराचा असल्याने भाजीपाला पिकाची फूलकळी गळली असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

----------------------------------

बदलत्या वातावरणाने आजारात वाढ

कोपर्डे हवेली : गेल्या पंधरा दिवसांपासून सतत वातावरण बदलत असल्याने सर्दी, डोके, अंगदुखी, आदी आजारात वाढ झाल्याने ग्रामीण भागातील दवाखाने हाऊसफुल्ल दिसत आहेत.

गेल्या पंधरा दिवसांत सतत वातावरणात बदल होत आहे. पहाटे थंडी, दिवसा उन्हाचा तडाखा, कधी आभाळ, आदी वातावरणातील बदलामुळे अनेकजण आजारी आहेत. सततच्या बदलत्या वातावरणामुळे शारीरिक आजार निर्माण झाले आहेत. सर्दी, पडसे, अंगदुखी, ताप, आदी आजाराने लोक त्रस्त झाले असून, ग्रामीण भागातील दवाखान्यांत गर्दी दिसत आहे.

Web Title: Presence of rain in Koparde mansion area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.