कुडाळ परिसरात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:20+5:302021-04-28T04:43:20+5:30
कुडाळ : कुडाळ परिसरात मंगळवारी सकाळपासूनच हवेत उष्मा वाढला होता. दरम्यान, दुपारनंतर वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह सायंकाळी चारच्या सुमारास ...
कुडाळ : कुडाळ परिसरात मंगळवारी सकाळपासूनच हवेत उष्मा वाढला होता. दरम्यान, दुपारनंतर वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह सायंकाळी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारांसह पावसाच्या हलक्या सरींची बरसात झाली.
गेल्या तीन-चार दिवसांपासून कुडाळ परिसरात चांगलाच उष्मा वाढला होता. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने मात्र उकाडा कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
परिसरात काही दिवसांपासून चांगलाच उकाडा वाढला होता. दिवसाच्या सरासरी तापमानातही वाढ झाली होती. अशातच सकाळपासून वातावरण बदलले होते. यामुळे उन्हाची तीव्रताही खूप होती. यामुळे सायंकाळी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने चांगलीच हजेरी लावली.