उदयनराजेंच्या उपस्थितीत तृतीयपंथींचा ‘फ्रेंडशीप डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 04:37 AM2017-08-07T04:37:34+5:302017-08-07T04:37:34+5:30
समाजाकडून सातत्याने अवहेलना व अपमानास्पद वागणूक मिळणाºया तृतीयपंथीयांनी रविवारी अनोख्या पद्धतीने ‘फ्रेंडशीप डे’ साजरा केला. खासदार उदयनराजे यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : समाजाकडून सातत्याने अवहेलना व अपमानास्पद वागणूक मिळणाºया तृतीयपंथीयांनी रविवारी अनोख्या पद्धतीने ‘फ्रेंडशीप डे’ साजरा केला. खासदार उदयनराजे यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.
सामाजिक कार्यकर्ते सुनीता व आर. डी. भोसले यांच्या प्रयत्नाने ‘तृतीय पंथीयांसाठी फ्रेंडशीप डे’ कार्यक्रम झाला. त्यास राज्यातून मोठ्या संख्येने तृतीयपंथीय उपस्थित होते.
खा. उदयनराजे म्हणाले, सर्वांना जगण्याचा अधिकार असला पाहिजे, या भावनेतून रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला. सर्वांना प्रेम दिल्याचा आनंद होत आहे.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना धर्म दान संस्थेचे प्रशांत म्हणाले, मुंबई येथे तृतीयपंथीयांसाठी लक्ष्मी त्रिपाठी यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला होता. त्याला एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी आले होते.