सध्याची वेळ प्रत्यक्ष मदतीची : पखाले; शेखर गोरेंच्या माध्यमातून कामासाठी पोकलेन मशिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:22 AM2018-05-11T00:22:41+5:302018-05-11T00:22:41+5:30
दहिवडी : ‘माण तालुक्यातील अनेक गावे श्रमदानातून उभी राहिली आहेत. लोकांचे जलसंधारणाबरोबर मनसंधारण होत आहे.
दहिवडी : ‘माण तालुक्यातील अनेक गावे श्रमदानातून उभी राहिली आहेत. लोकांचे जलसंधारणाबरोबर मनसंधारण होत आहे. त्यामुळे लोकांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे. सध्याची ही वेळ कोणतेही राजकारण करण्याची नसून
लोकांना प्रत्यक्ष मदत करण्याची आहे,’ असे मत सुरेखा पखाले यांनी व्यक्त केले.माण तालुक्यातील टाकेवाडी गावाला शेखर गोरे यांच्या माध्यमातून डिझेलसहित पोकलेन मशिन दिले आहे. तेथील कामाच्या प्रारंभप्रसंगी पखाले या बोलत होत्या.
पखाले पुढे म्हणाल्या, ‘माण तालुक्यात वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा सध्या अंतिम टप्यात आली आहे. शेखर गोरे यांनी काम करणाऱ्या गावाला मदत करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे लोकांच्या भावनाची कदर करून वॉटर कप स्पर्धा संपेपर्यंत पोकलेन मशीन टाकेवाडीत ठेवणार आहे. या माध्यमातून ग्रामस्थांनीही चांगले काम करावे. कारण या ठिकाणच्या लोकांना उन्हाळ्यात स्थलांतर करावे लागते, ही वेळ पुन्हा येऊ नये यासाठी पाणी अडवणे गरजेचे आहे. उद्या हेच पाणी अडले तर स्थलांतर करावे लागणार नाही. पाणी अडविणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची खरी गरज निर्माण झाली आहे.
अलीकडे अनेकजण आश्वासन देऊन निघून जातात. मात्र, आम्ही प्रत्यक्ष मदत करायचे धोरण ठेवले आहे. आज माण तालुक्यातील अनेक गावांत शेखर गोरे यांच्या माध्यमातून पोकलेन मशीन सुरू आहे. त्यामुळे लोकांना याचा खूप फायदा झाला आहे. गावोगावी जलसंधारणाची कामे होत असून त्याचा फायदा भविष्यात नक्कीच दिसून येणार आहे.
तुम्ही चांगले काम करा. लागेल ती मदत द्यायची भूमिका आम्ही घेऊ . टाकेवाडी गाव हे नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या ठिकाणी चांगली कामे व वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाली तर निश्चितच हे पर्यटनस्थळ होईल, असेही पखाले यावेळी म्हणाल्या.यावेळी वाघोजीराव पोळ, मामुशेठ वीरकर यांनी विचार व्यक्त केले.टाकेवाडी येथील या कार्यक्रमाला मान्यवरांसह विविध ग्रामस्थ उपस्थित होते.
टाकेवाडी, ता. माण येथे शेखर गोरे यांच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेसाठी पोकलेन मशीन देण्यात आले आहे. यावेळी सुरेखा पखाले, वाघोजीराव पोळ, मामुशेठ वीरकर, दत्ता घाडगे आदी उपस्थित होते.