पर्यावरण जतन, संवर्धन संस्कृतीची देण : मोहिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:43 AM2021-08-24T04:43:05+5:302021-08-24T04:43:05+5:30
पाचगणी : ‘सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनी प्रदूषणामुळे वसुंधरेचं स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करण्याचा ...
पाचगणी : ‘सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनी प्रदूषणामुळे वसुंधरेचं स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीनं दिला आहे. प्रत्येकाने निसर्गाचे नियम समजून घेणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.
पाचगणी (गोडवली) येथील हॉटेल मिलेनियम पार्क येथे पाचगणी रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रोटरी ३१३२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, स्वाती हेरकळ, नितीन कदम, राजेंद्र भगत उपस्थित होते.
वाई येथील ब्लॉसम अकॅडमीच्या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक, ब्लॉसम टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे चेअरमन व पाचगणीमधील न्यू इरा हायस्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवणारे व सचिवपदाची धुरा सांभाळणाऱ्या शिवाजी शिंदे यांची २०२१-२२ करिता अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर ‘आय लव पाचगणी’ फेस्टिवलचे माजी अध्यक्ष, सामाजिक कार्यात सक्रिय असणारे, नमस्ते पुरोहितचे संचालक भारत पुरोहित यांची सचिव म्हणून निवड झाली आहे. उपाध्यक्ष राजेंद्र पारठे यांनी नूतन अध्यक्षांना रोटरी काॅलर प्रदान केली.
राजेंद्र भगत, भूषण बोधे, राजेंद्र पारठे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. शिवाजी शिंदे यांनी स्वागत केले. सुरेश बिरामणे, शिवाजी शिंदे व जयवंत भिलारे यांना बेस्ट अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आले. विनिता प्रसाद यांनी आभार मानले.
चौकट:
कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाला गमवावं लागल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या निराधार महिलांचा उदरनिर्वाह चालावा यासाठी पदग्रहण सोहळ्याचे औचित्य साधत निराधार महिलांना स्वावलंबी करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी ६ महिलांना शिलाई मशीनचे केले वाटप करून मदतीचा हात देणाऱ्या पाचगणी रोटरी क्लबचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.