किल्ल्यांचे जतन, संवर्धन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:23+5:302021-06-09T04:48:23+5:30

नागठाणे : ‘किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे,’ असे उद्गार ...

Preservation of forts, conservation need time | किल्ल्यांचे जतन, संवर्धन काळाची गरज

किल्ल्यांचे जतन, संवर्धन काळाची गरज

googlenewsNext

नागठाणे : ‘किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे,’ असे उद्गार सातारा येथील शिवाजी काॅलेजमधील इतिहास विभागाचे माजी प्रा. मनोहर निकम यांनी काढले.

आर्ट्स अँड काॅमर्स काॅलेज, नागठाणे या महाविद्यालयात इतिहास विभाग व क्रांतिसिंह अभ्यास मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांच्याबरोबर केलेल्या लिंकेजेस अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘किल्ल्यांचे जतन व संवर्धन’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

निकम म्हणाले, ‘कोणत्याही ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार वास्तूंचे अत्याधुनिक पद्धतीने सर्वेक्षण, वास्तूंची दुरुस्ती, किल्ल्याचे व वास्तूंचे संवर्धन केले पाहिजे. तसेच किल्ल्यांचे जतन व संवर्धन करीत असताना योग्य वृक्षलागवड, मार्ग व्यवस्था, वास्तूंचे दिशादर्शक फलक व नकाशा आदी बाबींचे नियोजन करणे आवश्यक आहे.’

प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील म्हणाले, ‘स्वराज्य उभारणीमध्ये गड-किल्ल्यांचे योगदान मोलाचे असून, किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी स्थानिकांबरोबरच पर्यटकांचीही जबाबदारी तेवढीच आहे. तसेच किल्ले हा राज्याचा आत्मा असून, शास्रशुद्ध पद्धतीने किल्ल्याचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे.’

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी यासंदर्भात विद्यार्थी व प्राध्यापकांच्या प्रश्न व शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डाॅ. अजितकुमार जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. निकिता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आर. जे. राठोड यांनी आभार मानले.

Web Title: Preservation of forts, conservation need time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.