जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. सुखदेव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:38 AM2021-09-19T04:38:55+5:302021-09-19T04:38:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या सन २०२१/२२ च्या वार्षिक निवडणुकीच्या निवडी झाल्या असून, अध्यक्षपदी ॲड. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या सन २०२१/२२ च्या वार्षिक निवडणुकीच्या निवडी झाल्या असून, अध्यक्षपदी ॲड. सुखदेव पाटील तर उपाध्यक्षपदी ॲड. चंद्रकांत बेबले यांची निवड झाली आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी यामधील काही पदांच्या बिनविरोध निवडी झाल्या होत्या. उर्वरित पदांसाठी निवडणूक लागल्यानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. सहसचिव स्वाती गव्हाणे पाटील, सचिव ॲड. संभाजी कदम, खजिनदार ॲड. पृथ्वीराज पवार, महिला प्रतिनिधी ॲड. पूनम कुंभार, ॲड. वृषाली गाढवे व सदस्य म्हणून ॲड. आदित्य राजोपाध्ये, ॲड. अजिंक्य डोईफोडे, ॲड. अनुप लकडे, ॲड. चेतन काठाळे, ॲड. हंसराज बांबरस, ॲड. मुशफिकहमद पेंढारी, ॲड. योगेश काळंगे व ॲड. झहूर इनामदार हे विजयी झाले.
कै. मोहनराव पाटील यांच्या पॅनेलचा विजय झाला आहे. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे संघटनेतील आजी, माजी सहकरी तसेच समाजातील विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
पाच आयकार्ड फोटो मेल केले आहेत.