क्यूलिंग आर्टमधून बनवली चक्क सौंदर्यप्रसाधने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:31 AM2021-01-09T04:31:56+5:302021-01-09T04:31:56+5:30
कळंबेकर व कळंबेळकर असे आहे. नाव तपासून पाहावे????????????????? आर्याने शिकली लॉकडाऊनमध्ये ...
कळंबेकर व कळंबेळकर असे आहे. नाव तपासून पाहावे?????????????????
आर्याने शिकली लॉकडाऊनमध्ये अनोखी कला
सातारा : कोरोनाच्या महामारीत अनेकांना कधी नव्हे ते आठ महिने घरात कोंडून घ्यावं लागलं. या महाभयंकर काळात अनेकजण मानसिक तणावात राहिले, तर काहींनी हा वेळ सत्कारणी लावला. त्यापैकीच एक म्हणजे साताऱ्यातील महाविद्यालयीन युवती आर्या कळंबेळकरचे नाव घ्यावे लागेल. आर्याने केवळ आठ महिन्यात क्यूलिंग आर्ट शिकून घेतली. तीही गूगल अन् यूट्युबवर सर्च करून. आता आर्याने ही कला सफाईदारपणे आत्मसात केली असून, क्यूलिंग आर्टमधून तिने सौंदर्यप्रसाधने बनवली आहेत. हीच प्रसाधने ती आता संक्रांतीचे वाण म्हणून महिलांना भेट देणार आहे.
साताऱ्यातील मंगळवार पेठेत राहणारी आर्या कळंबेळकर ही वर्ये येथील केबीपी कॉलेजमध्ये बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आर्याचे शिक्षण ऑनलाईन सुरू झाले. दुपारी बारापर्यंतच तिचे ऑनलाईन क्लासेस सुरू होते. मात्र, त्यानंतर दिवसभर काहीच काम नव्हते. या फावल्या वेळात शालेय जीवनात वेळेअभावी राहून गेलेली आवडती क्यूलिंग आर्ट शिकण्याचा तिने चंग बांधला. ही आर्ट शिकण्यासाठी तिने गूगल आणि यु ट्युब सर्च करण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या रंगीत कागदांपासून विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू कशा बनवल्या जातात, याची इत्यंभूत माहिती तिने अल्पवधीतच आत्मसात केली. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे ती बनविण्यासाठी लागणारे साहित्य तिने ऑनलाईन मागवले. त्यामुळे तिला क्यूलिंग आर्ट शिकण्यास फारशी अडचण झाली नाही. आर्या सांगतेय, क्यूलिंग आर्ट समजायला सोपी आहे. जमायला लागल्यामुळे आवडायला लागलं. ही कला शिकण्यासाठी दहा महिने गेले. रक्षाबंधनाला राख्या बनवल्या, दिवाळीला ग्रीटिंग कार्ड, नवरात्र, गणेशोत्सवामध्येही ज्वेलरी बनवल्या. सुचत गेलं तसं बनवत गेले. संक्रांतीला हळदी-कुंकवाला महिलांना बोलावतात. त्यावेळी वाण म्हणून त्यांच्यासाठी छोटे छोटे कानातले बनवले आहे. तेच वाण म्हणून महिलांना देण्यात येणार आहे. बाकीची ज्वेलरी महाग असते. त्यामुळे वाण म्हणून देणे ते परवडणारे नसते. म्हणून क्यूलिंग आर्टमधून कानातले बनवले आहे. तीस ते चाळीस रुपये याची किंमत आहे. घरी आणि बाहेरही ही वस्तू आपण भेट देऊ शकतो.
हे टिकाऊ असते. आपल्या वापरण्यावर आहे. हे मेटल नाही. थोड्या दिवसांनी हे गंजेल किंवा काळे पडेल, असं होणार नाही. त्यामुळे आपल्या वापरण्यावर त्याची एक्स्पायरी डेट अवलंबून आहे. रेग्युलगर वापरण्यास हे अत्यंत चांगले आहे. हवे त्या कलरमध्ये मॅचिंग आणि परवडणारे आहे. आता मला यात आवड निर्माण झाली असून, भविष्यात व्यावसायिक दृष्टिकोनातूनही विचार होऊ शकतो, असे आर्या कळंबेळकरने सांगितलं.