तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात साडेचारशे बेड वाढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:10+5:302021-05-16T04:38:10+5:30
सातारा : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची ...
सातारा : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच आणखी साडेचारशे बेड नव्याने देण्यात येणार आहेत.
प्रशासनातर्फे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. आढळून आलेल्या रुग्णांची अवस्था बिकट होण्याआधीच स्थानिक पातळीवर त्यांच्यावर योग्य ते उपचार केले गेले तर रुग्ण अत्यवस्थ होत नसतात. लवकरात लवकर रुग्णाची तपासणी, लक्षणे दिसताच त्यांच्यावर औषधोपचार या गोष्टी तत्काळ केल्या गेल्या पाहिजेत. दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विशेष काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे.
प्रशासकीय यंत्रणा तयार
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात १७ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारायला घेतलेले आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठी तत्काळ ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, या हेतूने हे प्रकल्प उभे राहत आहेत.
ऑक्सिजन बेड
जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला ३ हजार ३४ इतके ऑक्सिजनचे बेड आहेत. तिसऱ्या लाटेचा विचार करून प्रशासनाने आणखी साडेचारशे बेड उपलब्ध करण्याची तयारी केलेली आहे.
कोबी डे केअर सेंटर
जिल्ह्यामध्ये डी सी एच १७ आणि डी सी एस सी ७२ कोरोना केअर सेंटर आहेत. आणखी २२ कोरोना केअर सेंटर चालवण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे. ऑक्सिजन निर्मिती झाल्यानंतर हे कोरोना केअर उपलब्ध होणार आहेत.
औषधांची कमतरता
जिल्ह्यामध्ये कोरोना विरोधात औषधे उपयोगी पडतात, त्यांची कमतरता भासत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना तसेच गृहविलगीकरण येथील रुग्णांना शासनातर्फे ही औषधे दिली जातात. परंतु, सध्या औषधांचा तुटवडा जाणवतो आहे. प्रशासनाने याबाबतची मागणी शासनाकडे केली आहे.
कोठे किती बेड वाढवणार
सातारा : १५०
कऱ्हाड : १५०
वाई : ५०
फलटण : १००
कोट..
जिल्ह्यामध्ये कोरोना केअर सेंटर वाढवण्यात येणार आहेत. काही रुग्णालयांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे. परंतु, ऑक्सिजनचा पुरवठा जोपर्यंत सुरळीत होत नाही, तोपर्यंत परवानगी दिली जाणार नाही. ऑक्सिजन मिळाल्यानंतर ही परवानगी दिली जाईल.
- डॉ. सुभाष चव्हाण
जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा