पत्नीस मारहाणप्रकरणी पतीवर प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:32+5:302021-04-24T04:40:32+5:30

सातारा : व्यवसायासाठी पैसे आण, असे म्हणत पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या पती विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा ...

Preventive action against husband for beating wife | पत्नीस मारहाणप्रकरणी पतीवर प्रतिबंधात्मक कारवाई

पत्नीस मारहाणप्रकरणी पतीवर प्रतिबंधात्मक कारवाई

Next

सातारा : व्यवसायासाठी पैसे आण, असे म्हणत पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या पती विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आलेली आहे.

सैफ अहमद नसरुद्दीन शेख (रा. साई अभय अपार्टमेंट, वाढे फाटा, सातारा) हा घरगुती कारणातून तसेच व्यवसायासाठी पैसे नसल्याच्या कारणातून पत्नीस मारहाण करत होता. दि. २१ रोजी रात्री ११ च्या सुमारास दारूच्या नशेत सैफ शेख याने त्याची पत्नी सुषमा भानुदास जाधव (वय ४३, रा. साई अभय अपार्टमेंट, वाढे फाटा, सातारा) यांना घरगुती कारण व व्यवसायासाठी लागणाऱ्या पैशाच्या कारणातून शिवीगाळ करत मारहाण केली. त्याने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी सैफ शेख याच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल करून हवालदार कदम यांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

Web Title: Preventive action against husband for beating wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.