मागील घडामोडींचा निवडणुकीवर होणार परिणाम
By admin | Published: November 12, 2016 11:59 PM2016-11-12T23:59:21+5:302016-11-13T01:21:32+5:30
स्वच्छता अभियानामुळे वेंगुर्ले चर्चेत : तर नगरपरिषदेवर बरखास्ती, पोटनिवडणुकीची नामुष्की; कुरघोडी करणाऱ्यांचा बदला घेण्याचे संकेत; तर संबंधितांना प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान
सातारा : पाचशे अन् हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील शेकडो बँकांमध्ये उसळलेली गर्दी तिसऱ्या दिवशीही कायमच होती. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यातील बँकांमध्ये सुमारे एक हजार कोटीच्या रद्द नोटा जमा झाल्या असून, यात दिवसेंदिवस वाढच होणार असल्याची शक्यता बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यात सरकारी, सहकारी, खासगी अन् ग्रामीण अशा एकूण ३३ बँकांच्या ५४८ शाखा कार्यरत आहेत. केवळ सर्वाधिक शाखा ‘बँक आॅफ महाराष्ट्र’च्या असून, पहिल्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या ६२ शाखांमध्ये एकूण ६० कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महादेव शिराळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पाचशे अन् हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी सर्वाधिक गर्दी भारतीय स्टेट बँकेच्या शाखांमध्ये दिसून येत आहे. प्रतापगंज पेठ शाखेत एका दिवसात सुमारे १६ कोटींच्या नोटा जमा होण्याची विक्रमी घटना घडली असून, इतर ठिकाणीही जवळपास अशीच आकडेवारी आहे. जिल्ह्यात या बँकेच्या पन्नास शाखा असून, शहरात सहा ठिकाणी प्रचंड गर्दी तिसऱ्या दिवशीही अनुभवयास मिळाली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४१ विस्तारित कक्षांसह एकूण ३१३ शाखांमध्ये एका दिवसात दीडशे कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्याची माहिती प्रभारी सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
तिसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे शनिवारी संध्याकाळपर्यंत जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधील जमा नोटांचा एकूण आकडा चारशे कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.
(प्रतिनिधी)
महिनाभराची उलाढाल तीन दिवसांत...
ज्या बँकेच्या एखाद्या शाखेची महिनाभराची उलाढाल जेवढी असते, तेवढी रक्कम केवळ तीन दिवसांमध्ये मोजण्यात सर्व बँक कर्मचारी व्यस्त झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, सर्वसामान्य सातारकरांनी अनेक तास रांगेत उभारून बँकेत जमा केलेल्या नोटांची ही आकडेवारी आहे.
रविवारीही सातारा जिल्ह्यातील बँका ग्राहकांसाठी सुरूच राहणार आहेत. अद्याप बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये नोटा भरण्यात न आल्याने रांगांची परंपरा चौथ्या दिवशीही सुरूच राहणार असल्याची शक्तता व्यक्त केली जात आहे.