पितृपंधरवड्यामुळे भाज्या खातायत भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:26+5:302021-09-25T04:42:26+5:30
सातारा : सध्या पितृपंधरवडा सुरू झाल्याने भाज्या भाव खाऊ लागल्या आहेत. मंडईपेक्षा घराजवळील दुकानात भाज्यांना जादा दर द्यावा लागत ...
सातारा : सध्या पितृपंधरवडा सुरू झाल्याने भाज्या भाव खाऊ लागल्या आहेत. मंडईपेक्षा घराजवळील दुकानात भाज्यांना जादा दर द्यावा लागत आहे. गवार, शेपू, भोपळ्याला मागणी अधिक वाढली आहे.
भारतीय संस्कृतीत पितृपंधरवड्याला महत्त्व आहे. पितृपक्षातील तिथीला श्राध्दविधी करण्याची परंपरा आहे. या दिवसांत पूर्वजांचे स्मरण करण्यात येते. तसेच श्राध्द जेवणाला पाहुण्याला जेवू घालतात. कावळ्यासाठीही खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. त्यामुळे पितृपंधरवड्यात भाज्यांना महत्त्व आलेले असते. यामध्ये गवारी, मेथी, शेपू, भेंडी, भोपळा भाज्यांना मागणी असते. त्यामुळे पितृपंधरवड्याच्या काळात भाज्यांचे दर वाढलेले असतात. आताही भाज्या भाव खाऊ लागल्या आहेत. पितृपंधरवडा संपेपर्यंत भाज्यांचे दर वाढलेलेच राहणार आहेत.
.....................................
भाज्याचे भाव प्रतिकिलो...
बाजारातील दर घराजवळील दर
वांगी ३० ४०
गवारी ६० ८०
कारली ४० ६०
भेंडी ४० ६०
वाटाणा ८० १००
टोमॅटो २० ३०
कोबी १५ २०
दोडका ४० ६०
भोपळा २० ४०
शेवगा ६० ८०
..............................................