राज्यभर सायकलप्रवास करणाऱ्या युवतीचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:25 AM2021-06-28T04:25:40+5:302021-06-28T04:25:40+5:30
पर्यावरण संवर्धनासाठी प्रणाली चिकटे ही २१ वर्षांची युवती महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सायकलने प्रवास करीत आहे. कऱ्हाडला पोहोचेपर्यंत नऊ हजार पाचशे ...
पर्यावरण संवर्धनासाठी प्रणाली चिकटे ही २१ वर्षांची युवती महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सायकलने प्रवास करीत आहे. कऱ्हाडला पोहोचेपर्यंत नऊ हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास तिने सायकलने पार केला आहे. ‘निसर्ग वाचवा आणि प्रदूषण टाळा’ हा संदेश ती देत आहे. हा प्रवास करण्यासाठी तिने चंद्रपूरमध्ये स्वत: ८० घरात पेपर टाकून सायकल विकत घेतली आणि प्रवास सुरू केला. आत्तापर्यंत २१ जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण झाला आहे. ३६ जिल्हे पूर्ण फिरून तिचा प्रवास थांबणार आहे. त्यामुळे गावपातळीवर तसेच इतर सर्व ठिकाणी प्रणालीच्या ध्येयाचे आणि साहसाचे कौतुक होत आहे. अनेक ठिकाणी तिचे स्वागत केले जात आहे. एकटी मुलगी महाराष्ट्रभर प्रवासाला निघाल्याने तिच्या साहसाचे विशेष कौतुक केले जात आहे. कऱ्हाडात आधार सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने प्रणालीचे स्वागत करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनेश मेटकरी, संचालक विक्रम शिरतोडे, तुषार जाधव, पूर्वा जाधव आदी उपस्थित होते.
फोटो : २७केआरडी०१
कॅप्शन : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राज्यभर सायकलवरून प्रवास करणाऱ्या प्रणाली चिकटे या युवतीचा कऱ्हाडात सत्कार करण्यात आला.