बामणोलीतील प्राथमिक आरोग्य विभागाचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 04:33 PM2017-12-13T16:33:06+5:302017-12-13T16:37:59+5:30
सातारा तालुक्यातील बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील लिपिक साहेब नागनाथ नागुलवाड याने ८५० रुपयांच्या लाचेची मागणी केल्यामुळे त्याला अटक केली आहे. संबंधित तक्रारदार यासुद्धा त्याच विभागात कार्यरत आहेत. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली आहे.
ठळक मुद्दे८५० रुपयांच्या लाचेची मागणी केल्यामुळे अटकदप्तर तपासणीच्या नावाखाली लाचेची मागणी तक्रार लाचलुचपत पोलिस ठाण्यात
सातारा: सातारा तालुक्यातील बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील लिपिक साहेब नागनाथ नागुलवाड याने ८५० रुपयांच्या लाचेची मागणी केल्यामुळे त्याला अटक केली आहे. संबंधित तक्रारदार यासुद्धा त्याच विभागात कार्यरत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, साहेब नागनाथ नागुलवाड हा दप्तर तपासणीच्या नावाखाली तक्रारदाराकडे ८५० रुपयांची मागणी केली. संबंधित तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत पोलिस ठाण्यात दिली होती.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली आहे.