प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक होणार रंगतदार...

By admin | Published: May 25, 2015 10:57 PM2015-05-25T22:57:50+5:302015-05-26T00:55:17+5:30

गटरचना महत्त्वाची : शिवाजीराव पाटील गटाची भूमिका निर्णायक

Primary teachers will be attending the bank elections ... | प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक होणार रंगतदार...

प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक होणार रंगतदार...

Next

कुडाळ : गतपंचवार्षिक निवडणुकीत संघात दोन गट पडल्याने शिक्षक बँकेत शिक्षक समितीची सत्ता आली होती. याचाच फायदा घेऊन समितीने स्वत:ला सुरक्षित करण्याच्या उद्देशाने मतदारसंघांची नव्याने गटरचना केली आहे. कराड-पाटण सोसायटीत सत्तेवर आलेल्या शिवाजीराव पाटील प्रणित संघाची भूमिकाच बँक निवडणुकीत निर्णायक ठरणार, हे निश्चित आहे. विजयासाठी पाटील गट आपल्याबरोबरच राहावा, यासाठी थोरात गट, शिक्षक समिती प्रयत्नशील आहे. त्यामुळे पाटील गट कोणाबरोबर जाणार? यावरच समीकरण ठरली जाणार आहेत.
कराड-पाटण सोसायटीत सत्ता मिळवल्यामुळे माजी आमदार शिवाजीराव पाटील प्रणित संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये बँक निवडणुकीचा भलताच उत्साह दिसतो आहे. त्यादृष्टीने त्यांनी बांधणी सुरू केली आहे. तर संभाजीराव थोरात प्रणित शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक यांनीदेखील जिल्हाभर संघटना बांधून सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली आहे. मात्र ९७ व्या घटना दुरुस्तीमुळे संचालकांनी संख्या २८ वरून २१ वर आल्यामुळे मतदारसंघ गटरचना बदलली आहे. गटरचना करताना सत्ताधारी शिक्षक समितीने आपल्याला सोयीस्कर अशीच गटरचना केल्यामुळे पाटील-थोरात गटाला एकत्र येऊनच ही निवडणूक लढवावी लागेल. स्वतंत्र लढल्यास मत विभाजनाचा फायदा हा समितीलाच होणार व संघाला सत्तेपासून बाजूला राहावे लागेल अशीच राजकीय परिस्थिती आहे.
पाटील गटाच्या संपर्कात थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक आहेत. त्यांच्याकडून पाटील गटाला बरोबर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर कराड-पाटण सोसायटीप्रमाणे समितीदेखील पाटील गटाबरोबरच निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. तसे प्रयत्नदेखील त्यांच्याकडून सुरू आहेत. त्यामुळे पाटील गटाला कोणताही पर्याय खुला असल्यामुळे पाटील गट ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. (प्रतिनिधी)

संघाच्या फुटीचा समितीला फायदा...
शिक्षकांची भूमिका संघाने लढा देऊन आपली ताकद वाढवली आहे. संघातील फुटीचा फायदा समितीला होऊ नये, कराड-पाटण सोसायटीत पाटील गटाने समितीला बरोबर घेतले. मात्र, शिक्षक बँकेत समितीला बाजूला ठेवून पाटील-थोरात गटाने एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी दोन्ही संघांतील शिक्षकांची भूमिका आहे.


माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचे नेतृत्व मान्य करून जो कोणी आमच्याबरोबर येईल त्यांना बरोबर घेऊन आम्ही बँक निवडणूक लढवणार.
- तुकाराम कदम,
कोषाध्यक्ष,
पाटील प्रणित शिक्षक संघ राज्य

Web Title: Primary teachers will be attending the bank elections ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.