वाढे फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; सातजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:29 PM2019-07-20T12:29:23+5:302019-07-20T12:29:34+5:30

वाढे फाटा येथील एका दुकानाच्या गोडाऊनच्या आडोशाला तीन पानी जुगार खेळणाऱ्या सातजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख २२ हजारांच्या पाच दुचाकीसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली.

Print this Article Print this article Seven people arrested | वाढे फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; सातजणांना अटक

वाढे फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; सातजणांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देवाढे फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; सातजणांना अटक

सातारा : वाढे फाटा येथील एका दुकानाच्या गोडाऊनच्या आडोशाला तीन पानी जुगार खेळणाऱ्या सातजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख २२ हजारांच्या पाच दुचाकीसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली.

शैलेश दिनेश पटेल (वय २९, रा. केशव कॉम्पलेक्स वाढे फाटा, सातारा), नीलेश विकास भांडे (वय २८, गुरूदत्त कॉलनी विकास नगर सातारा), सुमीत राजेंद्र पवार (वय ३०), ओंकार अजय साळुंखे (वय २६, रा. वाढे फाटा, सातारा), चंद्रकांत लक्ष्मण साळुंखे (वय ३७, रा. सैदापूर फाटा, सातारा), रियाज उस्मान शेख (वय ४९, गुरूवार पेठ सातारा), अशोक विष्णू कांबळे (वय २७, रा. विकास नगर खेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, हे सर्वजण वाढे फाटा येथील एका दुकानाच्या गोडाऊनच्या आडोशाला तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्यानुसार या शाखेच्या टीमने गुरुवारी रात्री आठ वाजता तेथे अचानक छापा टाकला. त्यावेळी हे सर्वजण जुगार खेळताना रंगेहात सापडले. त्यांच्याकडून पत्त्याची पाने, मोबाईल, पाच मोटारसायकली, पत्त्याच्या डावातील रोख रक्कम, टेबल, खुर्च्या असा एकूण ३ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एन.एस. कदम, सहायक फौजदार वाघमारे, साबळे, भोसले, पंकज ढाणे, ओंकार डुबल यांनी केली.

Web Title: Print this Article Print this article Seven people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.