आंब्याच्या झाडाखालील जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 03:47 PM2021-05-29T15:47:04+5:302021-05-29T15:48:32+5:30

Crimenews Satara : सातारा शहरातील सोमवार पेठ परिसरातील एका घराच्या मागे आंब्याच्या झाडाखाली तीन पानी जुगार खेळणाऱ्या आठजणांवर कारवाई करून त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेली रोख रक्कम व दोन दुचाकी असा २ लाख ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल शाहूपुरी पोलिसांनी हस्तगत केला.

Print on a gambling den under a mango tree | आंब्याच्या झाडाखालील जुगार अड्ड्यावर छापा

आंब्याच्या झाडाखालील जुगार अड्ड्यावर छापा

Next
ठळक मुद्देआंब्याच्या झाडाखालील जुगार अड्ड्यावर छापा आठजणांवर गुन्हा ; १ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा: शहरातील सोमवार पेठ परिसरातील एका घराच्या मागे आंब्याच्या झाडाखाली तीन पानी जुगार खेळणाऱ्या आठजणांवर कारवाई करून त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेली रोख रक्कम व दोन दुचाकी असा २ लाख ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल शाहूपुरी पोलिसांनी हस्तगत केला.

प्रमोद गोपाळ मांडवकर, भोलाद्दीन बाबासाहेब मुजावर, सतिश बाबासाहेब रूईकर (सर्व रा. यादोगोपाळ पेठ,सातारा), दीपक बजरंग किर्वे, नासीर अब्दुल करीम बागवान, बाळु रामचंद्र मुके (सर्व रा. सोमवार पेठ,सातारा), राजेंद्र बाळासाहेब शेलार (रा. भवानी पेठ,सातारा),ब्रुद्दीन मेहबुब बागवान (रा. दस्तगीर कॉलनी,सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पेठेत असणाऱ्या भुतकरांच्या घरामागे आंब्याच्या झाडाखाली काहीजण तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांना मिळाली. त्यानुसार शितोळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांसह छापा टाकून सर्व संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता, जुगार खेळत असल्याची कबुली त्यांनी दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडील रोख रक्कम व दोन दुचाकी असा १ लाख ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल,पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, हवालदार अमित माने, लैलेश फडतरे, ओंकार यादव यांनी केली.

Web Title: Print on a gambling den under a mango tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.