‘कुमुदा’च्या बेळगाव कार्यालयावर छापा

By admin | Published: April 8, 2017 10:03 PM2017-04-08T22:03:02+5:302017-04-08T22:03:02+5:30

कुमुदा शुगर्सचा अटकेत असणारा अध्यक्ष अविनाश भोसले याला घेऊन पोलिस पथक तपासासाठी बेळगावला गेले आहे.

Print on 'Kumuda' Belgaon office | ‘कुमुदा’च्या बेळगाव कार्यालयावर छापा

‘कुमुदा’च्या बेळगाव कार्यालयावर छापा

Next
>आॅनलाईन लोकमत
क-हाड (सातारा), दि. 8 - कुमुदा शुगर्सचा अटकेत असणारा अध्यक्ष अविनाश भोसले याला घेऊन पोलिस पथक तपासासाठी बेळगावला गेले आहे. शनिवारी या पथकाने बेळगावच्या कार्यालयात छापा टाकला तसेच करारपत्रही पोलिसांनी हस्तगत केले. या करारपत्राबाबत उपनिबंधक कार्यालयातील अधिकाºयांशी चर्चा क रून माहिती घेण्यात आली.
अविनाश भोसलेकडे पोलिस दोन दिवसांपासून कसून चौकशी करीत आहेत. कºहाड पोलिसांचे एक पथक अविनाश भोसलेला घेऊन तपासासाठी बेळगावला गेले आहे. पथकाने शनिवारी तेथील कार्यालयावर छापे टाकले. तसेच भोसलेला घेऊन हे पथक उपनिबंधक कार्यालयात गेले. तेथील करारपत्र हस्तगत करून त्याबाबत अधिकाºयांशी चर्चा करण्यात आली. बेळगाव येथील सबरजिस्टर कार्यालयात एका पार्टीने संमतीपत्र दिले असल्याने व दुसरी पार्टी हजर राहिल्याने करारपत्र करण्यात आल्याचे तेथील अधिकाºयांनी पोलिसांना सांगितले आहे.
भोसलेला अटक झाल्यानंतर शेकडो शेतकºयांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांत धाव घेतली आहे. २०१४-१५ मध्ये कुमुदा शुगर्सकडे ऊस घालवून ऊसबिलाचे एफ आरपीप्रमाणे कोट्यवधी रुपये थकित आहेत. ही थकित रक्कम न मिळालेल्या शेतकºयांनी पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रारअर्ज दाखल केले आहेत. तसेच ऊस वाहतूक दारांनीही तक्रारी दाखल केल्या आहेत.

Web Title: Print on 'Kumuda' Belgaon office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.