ग्रामीण भागातील मूलभूत विकासकामांना प्राधान्य : दीपाली साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:41 AM2021-08-23T04:41:31+5:302021-08-23T04:41:31+5:30
खंडाळा : ‘भादे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वाधिक विकासकामे झाली आहेत. एखाद्या गावाची सत्ता कोणाकडे ...
खंडाळा : ‘भादे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वाधिक विकासकामे झाली आहेत. एखाद्या गावाची सत्ता कोणाकडे आहे, याचा विचार न करता गावची विकासकामे करण्यात पक्षाच्या वतीने प्राधान्य दिले आहे. लोकांच्या सुविधांसाठी मूलभूत विकासकामे करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत’, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे यांनी केले.
भादवडे, (ता. खंडाळा) येथे जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे यांच्या प्रयत्नातून जनसुविधा योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या गाव ते स्मशानभूमी जोडरस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, बाळासाहेब साळुंखे, सरपंच बाबुराव भोसले, उपसरपंच मोनाली पवार, कुंडलिक पवार, अशोक पवार, नामदेव पवार, विलास पवार, भगत पवार, मनोज पवार, बंडू गोळे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा पवार, रेखा जाधव, विजय गोळे, अमोल पवार, अमोल वेदपाठक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.
दीपाली साळुंखे म्हणाल्या, ‘आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भादे गटातील विविध गावे व परिसराचा विकास झाला आहे. या पुढील काळातदेखील राष्ट्रवादी काँग्रेस गावोगावची विकासकामे करण्यात कदापि कमी पडणार नाही. मात्र, जनतेनेदेखील विकासकामे करणाऱ्यांच्याच पाठीशी उभे राहावे.’
मनोज पवार म्हणाले, ‘गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भादवडे गावाने विकासाला प्राधान्य देत विविध कामे साकारली आहेत. कार्यकर्त्यांची एकीची भावना गावाला पुढे घेऊन जाणारी आहे. या गावातील अतिरिक्त कामासाठी आणखी दोन लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.’
फोटो आहे..
२२खंडाळा