कराड बाजार समितीवर पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील गटाची सत्ता कायम 

By प्रमोद सुकरे | Published: May 1, 2023 07:27 PM2023-05-01T19:27:45+5:302023-05-01T19:28:05+5:30

कराड बाजार समितीवर पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील गटाने सत्ता राखली.

Prithviraj Chavan Uday Singh Patil group continues to rule Karad Bazar Committee | कराड बाजार समितीवर पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील गटाची सत्ता कायम 

कराड बाजार समितीवर पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील गटाची सत्ता कायम 

googlenewsNext

कराड (सातारा) : कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व रयत कारखान्याचे अध्यक्ष अँड. उदयसिंह पाटील यांच्या लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेलने १२ जागावर विजय मिळवत बाजार समितीवरील आपली सत्ता कायम राखली. तर आमदार बाळासाहेब पाटील व कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनेलला सहा जागांवर समाधान मानावे लागले. 

आज सकाळी मतमोजणी प्रारंभ झाल्यापासून विजयाचे पारडे कधी या पॅनेलकडे तर कधी त्या पॅनेलकडे झुकत होते. त्यातच सोसायटी मतदारसंघांमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याने या मतदारसंघात दोन्ही पॅनलच्या जागा निवडून आल्या. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही पॅनेलच्या समर्थकांनी विजयाची उधळण गुलालाची उधळण केली होती. अंतिम निकालानंतर मात्र पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील गटाने प्रचंड जल्लोष केला.या पँनेलला उत्तरमधून भाजपचे नेते मनोज घोरपडे, धैर्यशील कदम,रामक्रषण वेताळ यांची मोलाची  साथ मिळाली आहे.

लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-
सोसायटी मतदार संघ-विजयकुमार कदम 886 मते, दीपक उर्फ प्रकाश पाटील 898, सोसायटी महिला प्रवर्ग- इंदिरा जाधव पाटील 914, सोसायटी इतर मागास प्रवर्ग. सर्जेराव गुरव 922, सोसायटी भटक्या जमाती -संभाजी काकडे 924, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ -संभाजी चव्हाण 928, राजेंद्र चव्हाण 937, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल -शंकर इंगवले 972, ग्रामपंचायत अनुसूचित जाती - नितीन ढापरे 943, व्यापारी अडते गट जयंतीलाल पटेल 259, जगन्नाथ लावंड 255, हमाल मापाडी गणपत पाटील बिनविरोध.

शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार
सोसायटी सर्वसाधारण -जगदीश जगताप 900, मानसिंगराव जगदाळे 891, दयानंद पाटील 900, उद्धवराव फाळके 989, विनोद जाधव 907, सोसायटी महिला प्रवर्ग-रेखाताई पवार 926.

Web Title: Prithviraj Chavan Uday Singh Patil group continues to rule Karad Bazar Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.