खासगी बसला अपघात, सुदैवाने बचावले 33 प्रवाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 09:26 AM2019-10-12T09:26:41+5:302019-10-12T09:26:47+5:30
बसचालक भानुदास सावंत यांनी मोठ्या कसोशीने बसवर नियंत्रण मिळवून बसला पुढे जाण्यापासून रोखले.
सातारा - मुंबईहून-म्हसवडकडे जाणाऱ्या एका खासगी बसला फलटणजवळ अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, या बसमधून 33 प्रवासी प्रवास करत होते. बारामती पूलाजवळ स्मशानभूमी शेजारील बानगंगा नदीच्या कठड्याला धडकून ही बस खाली गेली. त्यामुळे, बसमधील सर्वच प्रवासी घाबरले होते. सुदैवाने कुणालाही मोठी जखम झाली असून दैव बलवत्तर म्हणूनच आपण वाचल्याचं प्रवाशांनी म्हटलं.
बसचालक भानुदास सावंत यांनी मोठ्या कसोशीने बसवर नियंत्रण मिळवून बसला पुढे जाण्यापासून रोखले. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक खोळंबली असून माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर बसमधील प्रवशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून घटनास्थळी पोहोचविण्यात आले. बसने पुलाच्या कठड्याला जोराची धडक दिली असती, तर बसल नदी कोसळून मोठी दुर्घटना घडली असती, असे तेथील स्थानिकांनी म्हटले. आज शनिवार पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.