पुण्यातील पर्यटकांच्या खासगी बसला पसरणी घाटात अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:08+5:302021-01-02T04:55:08+5:30
वाई : पसरणी घाटात महाबळेश्वरवरून पुणे-चाकणकडे निघालेली खासगी बस पलटी झाली. यामुळे बसमधील पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना ...
वाई : पसरणी घाटात महाबळेश्वरवरून पुणे-चाकणकडे निघालेली खासगी बस पलटी झाली. यामुळे बसमधील पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना वाई व पाचगणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले आले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पसरणी घाटातील पालखीरस्ता येथील वळणावर झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चाकण येथील सुप्रजीत इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वार्षिक सहल प्रतापगड, महाबळेश्वरला आली होती. प्रतापगड पाहून महाबळेश्वर येथे जेवण करून सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास बस वाईमार्गे चाकणकडे निघाली होती. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पसरणी घाटात पालखीरस्ता येथे बस (एमएच १४ सीडब्ल्यू ४७६४) ब्रेक फेल झाल्याने पलटी झाली. बसमध्ये तीस कर्मचारी होते.
अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस वाई पालिकेच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून जखमींना पाचगणी व वाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात पंधरा पर्यटक किरकोळ जखमी झाले. यामध्ये पोलीस व वाईतील नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये पोलीस व वाईतील नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मदत सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल करून वाहतूक सुरळीत केली.