कॉन्स्टेबलसह खासगी व्यक्ती लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:59 PM2019-07-29T12:59:26+5:302019-07-29T13:01:15+5:30
सातारा : अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शिवकुमार कोडगिरे यांना चार हजारांची लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर सलग दुसऱ्या ...
सातारा : अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शिवकुमार कोडगिरे यांना चार हजारांची लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून कॉन्स्टेबलसह एका खासगी व्यक्तीला पकडले. मिसिंग व्यक्तीच्या लग्नासाठी साक्षीदार असलेल्या व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी चार हजारांची लाच त्यांनी स्वीकारली.
अभिषेक आनंदराव डोळस (रा. पवार कॉलनी शाहूपुरी सातारा) असे पोलिस कॉन्स्टेबल तर अजय शिवाजीराव इनामदार (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) असे खासगी व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, काही दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एक मिसिंगचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यातील मिसिंग व्यक्तीच्या लग्नाला साक्षीदार म्हणून उपस्थित असलेल्या तक्रारदारावर अपहरणाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी कॉन्स्टेबल डोळस याने लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर लेखी तक्रार केली होती.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून शनिवारी शाहूपुरी पोलीस स्टेशन परिसरात सापळा लावला होता. मात्र, डोळस याने इनामदार याच्या कार्यालयात पैसे देण्याचे तक्रारदाराला सांगितले. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी प्रतापगंज पेठेत असलेल्या इनामदार याच्या कार्यालयाबाहेरच सापळा लावला.
इनामदार हा तक्रारदाराकडून चार हजार रुपये घेताना लाचलुचपतच्या अधिकाºयांनी त्याला रंगेहाथ पकडले. या दोघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अधिकाºयांनी सुरू केली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, सहायक फौजदार आनंदराव सपकाळ, हवालदार भारत शिंदे, संजय साळुंखे, विनोद राजे, अजित कर्णे, प्रशांत ताटे, विशाल खरात, निलेश येवले , संभाजी काटकर, महिला पोलीस श्रध्दा माने, शितल सपकाळ यांनी केली.