पालिकेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी !

By admin | Published: November 13, 2016 12:07 AM2016-11-13T00:07:13+5:302016-11-13T01:14:22+5:30

वैशाली बोले-दुबळे : दोन्ही आघाड्यांनी नगराध्यक्षांना रबर स्टॅम्प केल्याचा आरोप

Private Limited Company! | पालिकेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी !

पालिकेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी !

Next

सातारा : ‘शहरात पार्किंग व्यवस्था नाही. बागा, खेळाची मैदाने यांची सोय चांगल्या पद्धतीची नाही. अनेक ठिकाणी खेळासाठी राखीव असणारी जागा दोन्ही आघाड्यांच्या बगलबच्च्यांनी लाटली आहेत. विकासासाठी मला काय मिळते, याकडेच नगरसेवकांचे लक्ष असते. दोन्ही आघाड्यांचे पक्षप्रतोद आणि इतर दोघे असे एकूण चार-सहा जण पालिकेचा कारभार पाहतात. मात्र सातारा पालिका ‘प्रायव्हेट लिमिटेड’ करण्याचा काहींचा हेतू आम्ही साध्य होऊ देणार नाही,’ अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशाली बोले-दुबळे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केली.
वैशाली बोले म्हणाल्या, ‘नगराध्यक्षपद पाच वर्षांसाठी आहे. त्यातच नगराध्यक्षांना वापरायला मिळणाऱ्या पैशाचे घबाड पाहूनच काहीजण ही निवडणूक लढण्यासाठी उतरलेले आहेत. सर्वसामान्य उमेदवार डोईजड होऊ शकतो, हे लक्षात आल्यानेच नगरविकास आघाडीतर्फे स्वत: वेदांतिकाराजे भोसले निवडणूक लढवत आहेत. त्या साताऱ्याच्या नगराध्यक्ष झाल्या तर पालिकेचा कारभार पालिकेच्या इमारतीतून नव्हे तर ‘सुरुची’वरून चालेल. सर्वसामान्य माणसांना समस्या घेऊन जाणेही कठीण होणार आहे.’
‘वर्षानुवर्षे सत्ता केंद्रित झाल्याने साताऱ्याचा विकास थांबला आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूरच्या दृष्टीने सातारा शहर मागे राहिले आहे. नोकरीसाठी, शिक्षणासाठी इतकेच काय पण दवाखान्यात उपचार घेण्यासाठी देखील सातारकरांना सातारा शहर सोडावे लागत आहे. .’ असा आरोपही त्यांनी केला.
सातारा शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया उभा करण्याचा साधा प्रयोगदेखील झाला नाही, असे सांगून बोले म्हणाल्या, ‘४० वर्षे या लोकांनी काय केले, हेच जनतेला कळत नाही. शहराचा नगराध्यक्ष म्हणजे केवळ ‘रबर स्टँप’ राहिला.
बाकी सत्तेच्या चाव्या या दोन वाड्यांकडेच राहिल्या आहेत. कमिशन पोहोच झाल्याशिवाय ठेकेदाराला काम मिळत नाही.’
खासदारांनी मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅट्रॉसिटी रद्द करा, अशी मागणी केल्याने मागासवर्गीय लोक भयभीत झाले आहेत. इतर लोकप्रतिनिधी याबाबत शांत राहिले असताना साताऱ्याचे खासदार व आमदार यांनी मराठा मोर्चा आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेमुळे इतर मागास समाजही आपले आरक्षण हिरावून घेतले जाईल काय? या चिंतेत आहेत. प्लास्टिक बंदीत कारवाई केली गेल्याने व्यापारी, डॉक्टर नाराज आहेत.
बिल्डर लॉबीही वेदांतिकाराजे यांच्या उमेदवारीमुळे नाराज झाली आहे. पालिकेचे गाळे दोन्ही आघाड्यांनी कार्यकर्त्यांच्या घशात घातले आहेत.
भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा ‘जलमंदिर’शी रिलेटेड आहे.
मात्र, आताच त्या नगराध्यक्ष झाल्याच्या थाटात वावरत आहेत, असा टोलाही बोले यांनी लगावला. (प्रतिनिधी)



शहरातील सर्वसामान्य घरातील महिलाही साताऱ्याच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकते, हे दाखवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. निवडणुकीसाठी पैसा लागतो, हे चुकीचं वाक्य मी खोडून काढले आहे. शहरात ४० हजार महिला आहेत. आमदारांना नगराध्यक्षांना आपल्या घरातीलच महिला का दिसली?
- वैशाली बोले-दुबळे

Web Title: Private Limited Company!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.