खासगी प्रवासी बस उलटली; रत्नागिरीतील दोघी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 04:58 PM2019-12-03T16:58:34+5:302019-12-03T17:06:15+5:30
नागठाणे : भरधाव खासगी प्रवासी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील ...
नागठाणे : भरधाव खासगी प्रवासी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील दोघी जखमी झाल्या. हा अपघात मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास सातारा तालुक्यातील माजगाव फाट्याजवळ झाला. शारदा शांताराम कुंभार (वय ६९) आणि संपदा दीपक कुंभार (१९) असे जखमींची नावे आहेत.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास कऱ्हाडकडून साताऱ्याकडे खासगी प्रवासी गाडी (एमएच ०८ ई ९४१२) घेऊन चालक सुमित संजय जाधव (रा. उद्दमनगर, रत्नागिरी) हे निघाले होते. त्यांची गाडी मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास माजगाव हद्दीत आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे दुभाजकावर आदळून उलटी झाली. गाडीमधील महिला आणि मुलीस गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे हवालदार मनोहर सुर्वे, राजू शिखरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी नागठाणे येथे पाठवून दिले. रस्त्यावरच गाडी पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. याबाबतची सहदेव रामचंद्र पावसकर (रा. गावखडी, कुंभारवाडी) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली. हवालदार मनोहर सुर्वे तपास करत आहेत.