संस्थात्मक विलगीकरणासाठी प्रियदर्शनी वसतिगृह पुन्हा सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:40 AM2021-05-27T04:40:39+5:302021-05-27T04:40:39+5:30
रामापूर : जिल्ह्याच्या आणि त्याचबरोबर तालुक्यात ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, तो कमी करण्यासाठी तालुका प्रशासन नेटाने ...
रामापूर : जिल्ह्याच्या आणि त्याचबरोबर तालुक्यात ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, तो कमी करण्यासाठी तालुका प्रशासन नेटाने काम करते आहे. पण त्याला यश येत नाही याचे कारण बाधित रुग्ण हे गृह विलगीकरणाला पसंती देत आहेत ; पण कोरोनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करताना दिसत नाहीत म्हणून गृह विलगीकरणाला आता शासनाने बंदी आणली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत यशस्वीपणे मदत केलेले कोरोना केअर सेंटर म्हणजे कोयना शिक्षण संस्थेचे प्रियदर्शनी वसतिगृह होय. अशा ठिकाणी पाटण शहरातील नागरिकांच्या करिता संस्थात्मक विलगीकरणासाठी करण्यात येणार आहे.
पाटण तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा चढत्या क्रमाने वाढतो आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांच्या तालुक्यातील उपचार व्हावेत म्हणून पाटण शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेलमध्ये कोविड सेंटर नियमित रुग्णांना सेवा करिता सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरातील कोरोना बाधित रुग्णांकरिता आता गृह विलगीकरण पूर्णतः बंद करण्यात आले आहे. म्हणून शहरातील कोरोनाची सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांकरिता कोयना शिक्षण संस्थेचे प्रियदर्शनी वसतिगृहामध्ये करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता कोयना शिक्षण संस्थेने पाटणमधील आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत वापरण्यास आहे. त्याचबरोबर आता सुद्धा कोविड टेस्ट सुद्धा महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये केली जाते. आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोयना शिक्षण संस्थेचे प्रियदर्शनी होस्टेल कोरोना संस्थात्मक गृह विलगीकरण म्हणून उपलब्ध करून दिले आहे.