मुख्य बाजारपेठेत पार्किंगची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:27+5:302021-06-24T04:26:27+5:30
कऱ्हाडला वाढीव भागात फवारणीची मागणी कऱ्हाड : शहरातील वाढीव हद्दवाढ भागातील अनेक गटारांची सफाई पालिकेने केलेली नाही. ती साफसफाई ...
कऱ्हाडला वाढीव भागात फवारणीची मागणी
कऱ्हाड : शहरातील वाढीव हद्दवाढ भागातील अनेक गटारांची सफाई पालिकेने केलेली नाही. ती साफसफाई तातडीने करावी, अशी मागणी होत आहे. शहरात संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधक फवारणीची गरज आहे. त्यासाठी पालिकेने कार्वे नाक्यापासून पूर्व व पश्चिम भागातील सर्व भागांमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे. फवारणीचे वेळापत्रक आखून पालिकेने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
येवती ते पाटीलवाडीचा रस्ता बनला धोकादायक
उंडाळे : येवती ते पाटीलवाडी या तीन किलोमीटर अंतरावरील मार्गावर सध्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना रात्रीच्यावेळी प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने ही झाडेझुडपे तोडावीत, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे. यापूर्वी काहीवेळा या झाडा-झुडपांमुळे अपघात झाले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.